मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. आता एनसीबीच्या दक्षता विभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. मात्र, त्याचदरम्यान एबीपी माझाच्या हाती किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे काही व्हाट्सअप चॅट लागले आहेत. ज्यामध्ये या कारवाईवर अजून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. इतकंच नाही तर या चॅटमुळे किरण गोसावीने जे दावे केले आहेत तेही कुठेतरी फेल होताना दिसत आहेत.
2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये छापा मारला आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. त्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची खंडणी किरण गोसावी आणि सॅमकडून मागण्यात आल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला होता. मात्र, याचं उत्तर प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्यामध्ये झालेल्या चॅटमध्येच आहे. प्रभाकर साईल आणि किरण गोसावी हे दोघे क्रूझ प्रकरणात एनसीबीकडून पंच होते. मात्र, दोघांचीही वक्तव्ये एकमेकांपासून वेगळी आहेत.
Sameer Wankhede : आम्हाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर
आर्यन खानला अटक केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या खंडणीची मागण्यात आली नाही. पूजा ददलानीशी देखील बोलणं झालं नसल्याचा दावा किरण गोसावीकडून करण्यात आला होता. मात्र, प्रभाकर साईलच्या मोबाईलमधून प्रभाकर साईल आणि किरण गोसावीचे चॅट माझाच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातवगे पंच आणि किरण गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईल याच्या मोबाईलवर दुसऱ्या दिवशी किरण गोसावीने एक मॅसेज पाठवला होता. हा मॅसेज 3 ऑक्टोबरला करण्यात आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तू हाजी अलीला जा आणि तुला सांगितलेल काम पूर्ण कर आणि लगेच ये.
आता प्रश्न हा निर्माण होतो की किरण गोसावीने प्रभाकर साईलला असं कुठंल काम सांगितलं होतं? प्रभाकर कोणाला भेटायला गेला होता? हा प्रश्न यासाठीच महत्त्वाचा आहे. कारण, या प्रश्नाच्या उत्तरातच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आहे. कारण प्रभाकरने सांगितलं होतं की 3 ऑक्टोबरला किरण गोसावीने त्याला सांगितलं की हाजीअली येथील महालक्ष्मी, ताडदेव येथील इंडियाना हॉटेल जवळ जा आणि 50 लाख रु घे. ज्यानंतर 5102 नंबरच्या गाडीमध्ये दोन व्यक्ती आले आणि त्याला पन्नास लाख रुपये देऊन निघून गेले.
Sameer Wankhede Likely Transferred : समीर वानखेडेंची बदली होणार?
आता प्रश्न असा उपस्थित होतो की ती गाडी कोणाची होती? ते पन्नास लाख रुपये कोणी दिले? गोसावीने हे पैसे स्वतःसाठी घेतले होते का? किंवा त्याने एनसीबीच्या वतीने सेटलमेंटसाठी हे पैसे घेतले होते का? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.
तर दुसरीकडे फोटो आणि व्हिडिओमध्ये क्रुझमध्ये जेव्हा एनसीबीकडून कारवाई करण्यात आली. त्यावेळेसचेसुद्धा फोटो आहेत, ज्यामध्ये समीर वानखेडे कारवाई करत आहेत आणि किरण गोसावी यांच्या अतिशय निकट उभा असून त्याच्या संपूर्ण कारवाईमध्ये कितपत सहभाग आहे ते दाखवत आहेत.
Nawab Malik : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस करत लोकांना फसवलं?, नवाब मलिक यांनी दिला पुरावा
किरण गोसावीने प्रभाकर साईलला गेटवरच उभा केला आणि जी लोकं क्रुझवर येणार होती, त्यांचे फोटो आधीच त्याने प्रभाकरला पाठवले होते. जेणेकरून प्रभाकर त्यांना ओळखू शकेल आणि किरण गोसावीला लगेच त्यांनी एन्ट्री केल्यावर सुचना देईल. याचा अर्थ एनसीबीने त्यांचे टार्गेट आधीच आयडेंटिफाय केले होते.