Kalyan Crime News : कल्याणमधील (Kalyan) गौरी पाडा परिसरात एका सात वर्षीय मुलाची हत्या (Crime News) करण्यात आली आहे. प्रणव भोसले असे या मुलाचे नाव असून या मुलाच्या आईच्या मित्रानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खडकापाडा पोलिसांनी (Khadakpada Police) आरोपी नितीन कांबळे याला अटक केली आहे. नेमकं काय घडलं?
कल्याणमधील धक्कादायक घटना
कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, ज्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मुलाचा मृतदेह आढळला, त्याच इमारती मध्ये नितीन काही महिन्यांपूर्वी वॉचमनचे काम करत होता .आपले कृत्य लपवण्यासाठी नितीन पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने एका महिलेने माझे घेतलेले पैसे न दिल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. तर दुसरीकडे कविता यांनी शाळेतून सायंकाळी मुलगा प्रणव घरी न आल्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ नितीनला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. दरम्यान आर्थिक व्यवहारामुळे त्याने मुलाची हत्या केली की आणखी काही कारण आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केला.
मुलाच्या आईची पोलिसांत तक्रार
या घटनेबाबत माहिती अशी की, कविता भोसले महिला ही सात वर्षीय मुलगा प्रणव भोसले यांच्यासोबत खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत आहे. शाळेतून सायंकाळी मुलगा प्रणव घरी न आल्याने शाळेत जाऊन विचारपूस केली. कविताला माहित पडले की, मुलगा नितीन सोबत गेला आहे. मुलगा उशीरापर्यंत घरी न आल्याने कविता हिने खडकपाडा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याच दरम्यान नितीन कांबळे हा देखील खडकपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने कविता नावाची महिलेने माझ्याकडून पैसे घेतलेत. ती आता माझे पैसे परत करत नाही, त्यामुळे मी आत्महत्येचा प्रयत्न केला असे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नितीन कांबळेकडे अधिक चौकशी केली. प्रणवची आई कविता हिच्याकडे देखील चौकशी केली असता नितीन हा त्याचा ओळखीचे असल्याचे समोर आले.
पोलिसांचा संशय बळवला
पोलिसांना संशय बळवल्याने पोलिसांनी नितीनला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. तेव्हा नितीन ने केलेल्या कृत्याची कबुली दिली. नितीनने ओळखीचा फायदा घेत दुपारच्या सुमारास प्रणवला त्याच्या शाळेतून घेतले. तो प्रणवला घेऊन थेट गौरीपाडा परिसरातील सुंदर रेसिडेन्सी इमारतीच्या गच्चीवर गेला. तेथे त्यांनी प्रणवला पाण्याच्या टाकीत टाकून तिथून निघून गेला. आपले कृत्य लपवण्यासाठी त्याने कविता पैसे देत नसल्याचा सांगत आत्महत्याचा बनाव देखील रचला. याबाबत त्याने पोलीस ठाण्यात देखील माहिती दिली. मात्र अखेर त्याचे हे कृत्य उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळी जात मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला.
हत्येचे कारण काय? पोलिसांचा तपास सुरू
नितीन कांबळे हा सुंदर रेसिडेन्सी इमारतीमध्ये काही महिन्यांपूर्वी वॉचमन म्हणून काम करत होता. पोलिसांनी नितीनला अटक करत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. नितीनने कृत्य पैशांसाठी केले की आणखी काही कारण आहे याचा शोध सध्या खडकपाडा पोलीस घेत आहेत.