न्यायदानाच्या कामात विविध कारणांनी एखाद्या प्रकरणाला उशीर झाला, तर झालेला उशीर म्हणजे एक प्रकारे विचाराधीन आरोपीवर अन्याय करणारा ठरतो. या आशयाने इंग्रजीचे वाक्य "Justice delayed is justice denied" हे नेहमीच वापरले जाते..मात्र, एखाद्या खटल्यात चार आरोपींपैकी खटला सुरू असताना तीन आरोपींना वृद्धापकाळाने मृत्यु होत असेल. सात साक्षीदारांपैकी पाच साक्षीदार वृद्धापकाळाने मृत्यू होत असेल, तरी खटल्याचा निकाल लागत नसेल, मग याला आपण काय म्हणणार?


Breaking News LIVE :नागपुरात भाजप नेत्याच्या घरी चोरी,70 किलो वजनाची तिजोरी 35 लाखांच्या दागिन्यांसह पळवली


सध्या नागपुरात अशाच एका प्रकरणात भीमराव नितनवरे या 65 वर्षीय वृद्धाला निर्दोष मुक्त करण्यात आले. भीमराव व त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांनी 42 वर्षांपूर्वी एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 40 रुपये लुटल्याचे त्यांच्यावर आरोप होते. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाने 13 जानेवारी 1978 रोजी घडलेल्या लुटीच्या प्रकरणात आरोपी भीमराव नितनवरे यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांची आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. विशेष म्हणजे, 42 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. भीमराव यांनी त्यावेळी 40 रुपयांची लूट केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. 


नागपूर हिंगणा रोडवर मोतीराम गेडाम या व्यक्तीला रात्रीच्या वेळेस भीमराव आणि त्यांच्या सोबत असलेल्या रमेश मेश्राम, मधुकर पाटील आणि हिरामण ढोके या चौघांनी चाकूचा धाक दाखवत थांबवले. तसेच्या या चौघांनी मोतीराम यांच्या खिशातील 40 रुपये काढून घेतले होते. या घटनेत मोतीराम किरकोळ जखमी ही झाले होती. त्यावेळेस एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनेचा तपास करत लुटीच्या त्या घटनेत भीमराव आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरोधात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रमेश मेश्राम यांना अटक झाली होती. परंतु, या प्रकरणातील आरोप पत्र न्यायालयात दाखल होईपर्यंत आणि खटल्याचा कामकाज सुरू होऊपर्यंत 4 आरोपींपैकी रमेश मेश्राम, मधुकर पाटील आणि हिरामण ढोके यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. एवढेच नव्हेतर, याप्रकरणातील 7 साक्षीदारांपैकी 5 जणांचाही वृद्धपकाळाने मृत्यू झाला.


हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले. तेव्हा प्रकरणाला आजवर लागलेला कालावधी तसेच 3 आरोपींना झालेला मृत्यू आणि या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने या प्रकरणातील चार आरोपींपैकी एकमेव जिवंत असलेल्या आरोपी भीमराव नितनवरे यांची निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे 42 वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात सहभागी असल्याचा ठपका लागल्यानंतर भीमराव नितनवरे यांना आयुष्यभर चांगली नोकरीची संधी मिळाली नाही. जीवनाचा बराच काळ त्यांनी सुरक्षारक्षक म्हणून काम करून काढला. सध्या ते 65 वर्षाचे असून सुरक्षा रक्षकाच्या कामातून ही निवृत्त झाले.