Breaking News LIVE : ठाणे महापालिकेने जाहीर केला बोनस, सर्वात पहिला बोनस जाहीर करणारी महापालिका

Breaking News LIVE Updates, 25 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 25 Oct 2021 06:28 PM
ठाणे महापालिकेने जाहीर केला बोनस, सर्वात पहिला बोनस जाहीर करणारी महापालिका

ठाणे महापालिकेने बोनस जाहीर केला आहे.  यावर्षी सर्वात पहिला बोनस जाहीर करणारी महापालिका आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला 15 हजार 500 रुपये सरसकट बोनस मिळणार आहे. पालिकेत एकूण  8172 कर्मचारी असल्यामुळे पालिकेवर साडे बारा कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. 

जीवाला धोका असल्याने संरक्षण देण्याची प्रभाकर साईल यांची मागणी

क्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल पोलीस आयुक्तालयात, जीवाला धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी



 



 

अभिनेता एजाज खान यांची पत्नी एन्ड्रिंया एनसीबी कार्यालयात पोहोचली

अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणी ३० मार्च २०२१ ला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. एनसीबीने शादाब शेख उर्फ शादाब बटाटा या अंमलीपदार्थ विक्रेत्याला मार्च महिन्यात अटक केली होती. त्याच्या चौकशीतुन एजाज खानचं नाव समोर आलं होतं. याचं प्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी एजाज खानच्या पत्नीला एनसीबीने समन्स बजावलं होतं. त्यानुसार चौकशीसाठी एन्ड्रिंया एनसीबी कार्यालयात पोहचली आहे.

नागपूरच्या भाजप नेत्याच्या घरी चोरी,70 किलो वजनाची लोखंडी तिजोरी 35 लाखांच्या दागिन्यांसह पळवली

नागपूरच्या  भाजप नेत्याच्या घरी चोरी,70 किलो वजनाची लोखंडी तिजोरी 35 लाखांच्या दागिन्यांसह पळवली


नेताजी कुटुंबासह मुंबई वारीवर असताना घरातून 35 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास... 


धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी दागिने चोरण्यासाठी तब्बल 70 किलो वजनाची लोखंडी तिजोरी 35 लाखांच्या दागिन्यांसह पळवली...


70 किलोच्या लोखंडी तिजोरी शिवाय घरातील इतर सर्व मुद्देमाल सुरक्षित...

क्रुझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल आयुक्त कार्यालयात दाखल

LIVE TV : क्रुझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल आयुक्त कार्यालयात दाखल, जीवाला धोका असल्याची तक्रार, संरक्षणाची मागणी https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

प्रभकार सईल याच्या हिंमतीचं राऊतांनी केलं कौतुक

प्रभकार सईल याच्या हिंमतीला दाद देतो. समोर येऊन सत्य सांगून प्रभाकर यांनी देशावर आणि महाराष्ट्रावर मोठे उपकार केले आहेत. त्यांना सुरक्षा देण्यात यावी, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बोलणार आहे, - संजय राऊत

सॅम डिसुझा हा मुंबईतल्या मनी लँड्रिंगमधील सर्वात मोठा मासा आहे. - संजय राऊत

सॅम डिसुझा हा मुंबईतल्या मनी लँड्रिंगमधील सर्वात मोठा मासा आहे. हा खूप मोठा खेळ आहे. आता खेळ सुरु झालाय- संजय राऊत

नाशकातील कांदे व्यापारी आयकर विभागाच्या रडारावर

नाशिकमधील कांदे व्यापारी आयकर विभागाच्या रडारावर आले आहेत. येथील दहा कांदे व्यापाऱ्यावर आयकर विभागाने छापेमारी केली. यामध्ये जवळपास कोट्यवधी रुपयांचं घबाड जप्त करण्यात आल्याचं समजतेय. 

सोलापुरात एसटी बसचा अपघात, 15 जण जखमी

थांबलेल्या कंटेनरला एसटी बसने धडक दिल्याने 10 ते 15 प्रवासी जखमी झाल्याची घटना सोलापुरात घडलीय. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील चिखलीजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात निघालेल्या पुणे - उमरगा राज्य परिवहन मंडळाच्या एसटीचा हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बसच्या वाहकासह दहा ते पंधरा प्रवासी जखमी आहेत. पुण्याहून उमरग्याकडे जातं असताना पहाटे तीन वाजता सुमारास हा अपघात झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. मात्र यामध्ये बसच्या समोरचा भाग अक्षरशः चक्काचुर झाला आहे.

बाजारातल्या दरापेक्षा स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, डिजिटल सोने खरेदीसाठी रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात

सध्या लगीनसराई आणि सणासुदीचा काळ सुरु आहे. त्यामुळे या काळात सोन्याचे दागिने खरेदी केली जाते. काळ बदलतोय आणि त्यानुसार सोनं खरेदी करण्याची पद्धतही बदलतेय. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी डिजिटल सोने खरेदी करुन तुम्ही सहज गुंतवणूक करु शकता. केंद्र सरकारने ही संधी उपलब्ध करुन दिलीय. आजपासून रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात होतेय. ही योजना आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पाच दिवसांसाठीच असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूटदेखील मिळणार आहे. सोने खरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. या योजनेत एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. 

वाढत्या खाद्यतेलांच्या किमतींबाबत केंद्र सरकारची आज महत्वाची बैठक

वाढत्या खाद्यतेलांच्या किमतींबाबत केंद्र सरकारने आज महत्वाची बैठक बोलावलीय. केंद्र सरकार आज सर्व राज्यांसोबत चर्चा करणार आहेत. बैठकीत खाद्यतेलांच्या साठ्याची मर्यादा ठरवण्याची शक्यता आहे. 

क्रूझ ड्रग्स प्रकरणाला नवं वळण, NCB ने पंचाचे आरोप फेटाळले

क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर करण्यात आला. दरम्यान, समीर वानखेडेंकडून सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलंय. सध्या प्रकरणावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. मात्र, प्रभाकर साईल यांनी लावलेले आरोप त्यांनी फेटाळलेत.

विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

विदर्भातील शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलीय. पुढील दीड वर्षात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती गडकरींनी दिलीय. ते अमरावती येथे एका महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. 

पार्श्वभूमी

Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी अनन्या पांडेला पुन्हा एनसीबीचं समन्स; आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश


Mumbai Cruise Drug Case : अभिनेत्री अनन्या पांडेला आज पुन्हा एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे. शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी अनन्या पांडेला (Ananya Pandey) ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते. दरम्यान, एनसीबी (NCB) सध्या मुंबईतीस क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. 


अनन्याची चौकशी का केली जात आहे?


अनन्या पांडेची गुरुवारी सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते..


IND vs PAK: टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं


IND vs PAK, T20 WC 2021 : दुबई येथे झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभावला सामोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारतीय संघाचा दहा विकेटनं पराभव केला. नाणेफेकीपासूनच सर्व काही भारतीय संघाच्या विरोधात गेलं. पहिल्या चेंडूपासून पाकिस्तान संघानं मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम ठेवली. विश्वचषकात पाकिस्तानकडून पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव झाला. नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 151 धावा करता आल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात पार केलं. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आगामी सामन्यात भारतीय संघ या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल. पाहूयात पाकिस्तानविरोधात भारतीय संघाच्या पराभवाची कारण काय असू शकतात.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.