मुंबई  : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


पुणे महानगरपालिका-  विविध पदांच्या 36  जागांवर भरती होत आहे.



  • पोस्ट – प्राध्यापक

  • एकूण जागा - चार

  • शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात, तीन वर्षांचा अनुभव


दुसरी पोस्ट – सहयोगी प्राध्यापक



  • एकूण जागा -11

  • शैक्षणिक पात्रता-  पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात, चार वर्षांचा अनुभव

  • तिसरी पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक

  • एकूण जागा – 14

  • शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयातह, मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.एस्सी सह संबंधित विषयामध्ये पीएच.डी., तीन वर्षांचा अनुभव


यासोबतच शिक्षक, वरिष्ठ, कनिष्ठ निवासी पदासाठीही रिक्त जागा आहेत. याविषयी तुम्हाला वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल.


ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.


अर्ज पाठवण्याचा पत्ता - भरती कक्ष टेंडर सेलच्या समोर, तळमजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे



  • ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2022  

  • ऑनलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022


संकेतस्थळ - www.pmc.gov.in    (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन काय आहे, यात सेवाभरतीवर क्लिक करा. त्यात सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची पीडीएफ लिंक दिसेल. क्लिक  करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी 



  • पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक

  • एकूण जागा – 190

  • शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव किंवा PhD आणि एक वर्षाचा अनुभव

  • वयोमर्यादा – 18 ते 40  वर्ष

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022

  • अधिकृत वेबसाईट - nift.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर we are hiring मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)