CPCL Recruitment 2022 : चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (CPCL) कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी लवकरच अर्ज करावेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साइट cpcl.co.in ला भेट द्यावी लागेल. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 14 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.


रिक्त जागा तपशील
या भरतीतून कनिष्ठ अभियंता पदाच्या 72 जागा भरण्यात येणार आहेत.


शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पात्रतेनुसार उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयातील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय 26 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. उच्च वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची विशेष सूट असेल.


अर्जाची फी
अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट दिली जाईल.


कशी असेल निवड प्रक्रिया?
या भरतीअंतर्गत उमेदवारांची लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे या पदांसाठी निवड केली जाईल. उमेदवारांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तसेच परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha