Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेड या ठिकाणी भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कुठे करायचा ही आणि इतर सर्व माहिती खाली देण्यात येत आहे. 


इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.


IOCL मध्ये मार्केटिंग विभागांतर्गत ट्रेड अप्रेंटिस आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी भरती होत आहे.


एकूण जागा – 626


पहिली पोस्ट – ट्रेड अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता - NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त नियमित पूर्णवेळ ITI असणं आवश्यक आहे.


 
दुसरी पोस्ट - तंत्रज्ञ शिकाऊ


शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात किमान 50 टक्के गुणांसह तीन वर्षांचा डिप्लोमा


 
तिसरी पोस्ट- ट्रेड अप्रेंटिस-लेखापाल


शैक्षणिक पात्रता – पदवीधर


 
चौथी पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर (कुशल प्रमाणपत्र धारक)


शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण किंवा ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ मध्ये कौशल्य प्रमाणपत्रासह समतुल्य


 
पाचवी पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस-रिटेल सेल्स असोसिएट (कुशल प्रमाणपत्र धारक)


शैणक्षिक पात्रता – 12वी पास


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी आणि 15 फेब्रुवारी


वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष


अधिकृत वेबसाईटiocl.com


या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. त्यात तुम्ही related links मध्ये appreticeships वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. पीडीएफ फाईलवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.



राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबई 


एकूण जागा – 18


पहिली पोस्ट – व्यवस्थापक


एकूण जागा – 5


शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी आणि 13 वर्षांचा अनुभव



दुसरी पोस्ट – वरिष्ठ व्यवस्थापक


एकूण जागा – 2


शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी आणि १७ वर्षांचा अनुभव


 
तिसरी पोस्ट – अधिकारी


एकूण जागा – 11


शैक्षणिक पात्रता - MBBS/ CA/ CMA/ कोणत्याही शाखेतील पदवी किंवा रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी, अनुभव महत्वाचा आहे.


नोकरीचं ठिकाण – मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 फेब्रुवारी 2022


अधिकृत वेबसाईट - www.rcfltd.com


या वेबसाईटवर गेल्यावर HR मध्ये recruitment वर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.


संबंधित बातम्या :