नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाली. जेएनयूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. ज्याठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सरु होतं, त्याठिकाणीही दीपिकाने आंदोलनकर्त्यांची भेटही घेतली आहे. दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष गंभीर जखमी झाली होती.


जेएनयू कॅम्पसमध्ये रविवारी झालेल्या हिंसेविरोधात आंदोलन सुरू असतानाच तिथे अचानक दीपिका पादुकोण पोहोचली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच तिने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तिने विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोषची भेट घेतली. दरम्यान, दीपिकाने मीडियासोबत काहीच संवाद साधला नाही आणि ती परतली.


जेएनयूत रविवारी रात्र काय झालं?

राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या.

पाहा व्हिडीओ : जेएनयूतील हल्ला पाहून 26/11ची आठवण झाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद 



दरम्यान, दीपिका पादुकोण सध्या आपला आगामी चित्रपट 'छपाक'च्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये आहे. हा चित्रपट 10 जानेवारी रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून यामध्ये दीपिकासोबत विक्रांत मेस्सी दिसणार आहे.

संबंधित बातम्या :

जेएनयूत रविवारी रात्र काय झालं? मास्कधारी गुंडांचा मुलींच्या वसतीगृहात हैदोस

JNU Attack | हल्ल्यात जखमी झालेली जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष कोण आहे?

JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती?

JNUSU ची अध्यक्ष आयशी घोषसह 19 विद्यार्थ्यांवर गुन्हा