Jayant Patil on Govt : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण होत आहे. अशातच कांदा निर्यातीवर बंदी (Onion Export Ban)घालण्यात आली आहे. यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. दरम्यान, कांदा निर्यातबंदीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याचं पाटील यांनी म्हटलंय.
गेल्या दोन दिवसांपासून सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उटवली अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, अद्यापही कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उटवण्यात आलेली नाही. या केवळ अफवाच आहेत. सरकारनं याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं आहे. यावरुन जयंत पाटील यांनी आक्रनक पवित्रा घेतला आहे. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याची जहरी टीका जयंत पाटलांनी केलीय.
हंगामअखेर सुमारे 86 लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज
राज्यात चालू रब्बी हंगामात 4 लाख 32 हजार 798 हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगामअखेर सुमारे 86 लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते आणि शेतकऱ्यांचे पुन्हा अजून नुकसान होऊ शकते असं जयंत पाटलांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकारनं कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय लागू केला आहे. यामुळं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून कांद्यावरील निर्यातबंदी उटवल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नसल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकानं घेतली आहे. त्यामुळं कांद्याचे दर वाढण्याची शक्यचा कमीच असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या: