Jayant Patil on Ajit Pawar  मुंबई :चूक भूल करू नका, बापासोबत राहा...बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या कन्येला दिला आहे.  वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, असे  देखील अजित पवार म्हणाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहेरी येथील  जनसन्मान यात्रेत बोलत होते. 


दरम्यान, याच मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत मिश्किल टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की, यावर अजित पवार यांनी स्वतःहून सांगितले आहे. सध्याचे अजित दादा हे अरोरा नावाच्या कन्सल्टंट सांगतील तसे बोलतात. किंबहुना, अरोराने त्यांना मूळ स्वभाव दाखवण्यास पूर्ण बंदी केली आहे. अजित पवार पहिले सारखे बोलत नाहीत. अरोरा नावाचा कन्स्लटन्ट सांगतो तसेच अजित पवार बोलतात. सल्लागार सांगतात तसे त्यांना बोलावं लागत असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.शिवस्वराज यात्रे दरम्यान त्यांनी हे भाष्य केले आहे.  


मागणी करावी अशी अजित पवार यांची पोझिशन नाही- जयंत पाटील


दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी दावा केल्याच्या चर्चा आहे. तर याविषयी जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील. त्यांची मागणी करावी अशी अवस्था आहे, असं ही मला वाटत नाही. निवडणुकीपूर्वी अशी मागणी ते करतील असे मला वाटत नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. ही बाहेर कुणीतरी खोटी बातमी पसरवली असेल. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. अनेकांना तिथे मुख्यमंत्री व्हायचे आहे, असेही ते म्हणाले.


नागपूर येथील शिवस्वराज्य यात्रा रद्द- जयंत पाटील


शिवस्वराज्य यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष महेबूब शेख भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे पोहोचले आहेत. शिवस्वराज यात्रा भंडारा, गोंदियात आज असेल, तर उद्याची नागपूर यात्रा रद्द केली आहे. परवा गडचिरोली अहेरीत यात्रा असेल. अहेरीत गेल्यावर कळेल कोणाला आमच्या पक्षात यायचं आहे आणि कुणाला नाही, असे सूचक वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलं आहे. 


हे ही वाचा