जालना : एका कंपनीमध्ये खंडणी मागण्यांसाठी गेलेल्या आरोपीना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात दोन पोलीस जखमी झाले असून बुधवारी झालेल्या घटनेमुळे व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहे.


जालना जिल्ह्यातील खादगाव औद्योगिक वसाहतीमधील या सिद्धार्थ ऍग्रो प्रॉडक्ट्स कंपनीच्या गेटवर काल तीन आरोपीना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच चाकू हल्ला झाला. ज्यात पोलीस कॉन्स्टेबल मनसुब वेताळ आणि प्रभाकर वाघ जखमी झाले. यातील पोलीस कॉन्स्टेबल मनसुब वेताळ यांच्या पोटाला चाकू लागल्याने ते सध्या दवखण्यात  उपचार घेत आहेत.


काल तीन आरोपीनी कंपनीच्या गेटवर येऊन बळजबरीने आत घुसून व्यवस्थापकाला धमकावत धुडगूस घातला. व्यापस्थापकला मारहाण करत लाख रुपयांची मागणी करत कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. अचानक झालेल्या हल्ल्याने कंपनी  व्यापस्थापन दहशतीखाली आलं आहे.


दरम्यान, पोलीस हजर होताच आरोपीनी तेथून पळ काढण्यासाठी पोलीसांवर हल्ला चढवला. यात दोन पोलिसांवर चाकू हल्ला करून आरोपी पळून जाण्याचा यशस्वी झाले. या घटनेनंतर अखेर खबऱ्यामार्फत पोलिसांनी या आरोपींचा माग काढत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


या प्रकरणात दोन आरोपीना अटक केली असली तरी पोलिसांवर हल्ला करणारा तसेच खंडणी उकळू पाहणारा मुख्य आरोपी मात्र पोलिसांच्या अद्याप हाती लागला नाही. तो लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असली तरी दिवसाढवळ्या एखाद्या कंपनीत शिरून तोडफोड करून पोलिसांवर हात उगारण्याचं धाडस गुन्हेगारांना होतंय हे सर्वात जास्त गंभीर आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :