जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोथींबीरीसह कोबीचं पिकं मातीत, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका

राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातलाय. काही भागात जनजीवन विस्कळीत झालंय. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस (Heavy Rain)  झाला आहे.

Continues below advertisement

Jalna : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस (Heavy Rain)  झाला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा माव या गावातील शेतकऱ्याच्या कोथींबीर पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

Continues below advertisement

जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाने भाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा माव, गावात एक एकर कोथिंबीर पाण्याखाली गेली आहे. तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे गोबी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. हातातोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळं हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून  सुरु असलेल्या पावसामुळं नदी-नाले तुडुंब 

जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळं फळपीकाबरोबर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथील शेतकरी नाथाजी खवल यांच्या शेतात विक्रीला आलेली कोथिंबीर गेल्या तीन दिवसापासून पाण्याखाली गेली आहे. यामुळं त्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील कोबीचं पिक मातीत मिसळलंय. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून फळपिक उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही  बहुतांश ठिकाणी व्यापला आहे. मान्सूनने आठवडाभर राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असून आता काहीशी उसंत घेतली आहे. मुंबईसह पुण्यात आता पुढील चार दिवस पावसाची ओढ कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान केंद्राने दिलाय. आज तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून विदर्भात आज पावसाचा जोर चांगला राहणार आहे. उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचंही IMDनं सांगितलं. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अस आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

लातूरमध्ये 9 दिवसांपासून पाऊस; पूरस्थिती लक्षात घेत आपत्ती व्यवस्थापन सज्ज, 8 बोटी, 6 पथके, नोडल अधिकारी अलर्ट

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola