Abhimanyu Easwaran : डोळ्यासमोर 15 डेब्यू पाहिले, पण ‘तो’ अजूनही वेटिंग लिस्टवर; टीम इंडियातील 'या' खेळाडूचं करिअर पाणी देण्यात संपणार?

England vs India 4th Test Update : टीम इंडियाचे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे. यातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, तर काही क्रिकेटपटू अपयशी ठरले.

Continues below advertisement

Abhimanyu Easwaran IND vs ENG Test News

Continues below advertisement
1/8
टीम इंडियाचे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे. यातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, तर काही क्रिकेटपटू अपयशी ठरले.
2/8
यातील एक खेळाडू असाही आहे ज्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे, पण तो गेल्या 3 वर्षांपासून वाट पाहत होता की त्यालाही संधी मिळावी. या खेळाडूचे नाव अभिमन्यू ईश्वरन आहे.
3/8
2022 मध्ये झालेल्या भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी अभिमन्यू ईश्वरनला पहिल्यांदा टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले होते. या मालिकेत अनेक खेळाडूंना संधी मिळाली, पण अभिमन्यू ईश्वरनला कसोटी पदार्पण करता आले नाही.
4/8
यानंतर अशा आणखी काही कसोटी मालिका झाल्या, ज्यामध्ये त्याचे नाव संघात समाविष्ट करण्यात आले होते. परंतु अभिमन्यूला संधी मिळाली नाही.
5/8
अभिमन्यू ईश्वरन भारतीय कसोटी संघात सामील झाल्यानंतर एकूण 15 खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले आहे.
Continues below advertisement
6/8
या खेळाडूंची नावे अशी आहेत केएस भरत, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिकल, हर्षित राणा, साई सुदर्शन आणि अंशुल कंबोज.
7/8
अंशुल कंबोजने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत कसोटी पदार्पण केले.
8/8
त्यामुळे अभिमन्यू ईश्वरनची कारकीर्द अशीच संपणार, असे चाहते म्हणत आहे.
Sponsored Links by Taboola