Jalna news: जालना जिल्ह्यात आज पासून जमावबंदी व शस्त्र बंदीचा (Curfew and weapon Ban) आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी हे आदेश जारी केले असून आज सकाळी दहा वाजल्यापासून ते 30 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.


सणवार उत्सव तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षण (Maratha OBC reservation) आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय.


सार्वजनिक ठिकाणी भावना दुखावणारे भाषण करता येणार नाही


या आदेशानुसार जालना जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती किंवा समूहाबद्दल जाणून बुजून भावना दुखावणारे भाषण करता येणार नाही. मराठा -ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी म्हणून हा देश जारी केल्याचं सांगण्यात येत आहे. 


शारीरिक इजा करणाऱ्या तीक्ष्ण वस्तू वापरण्यास बंदी


जमावबंदी व शस्त्र बंदीच्या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्ती किंवा समूहास, शस्त्रे बंदूक दगड अथवा शारीरिक इजा करणाऱ्या तीक्ष्ण वस्तू बाळगता येणार नाहीत. 


भावना दुखावण्याचा उद्देशाने गाणी वाजवण्यास मज्जाव


भावना दुखवण्याच्या उद्देशाने वाद्य,गाणी वाजवणे किंवा एखाद्या प्रतिकृतीच्या माध्यमातून हेतूत: प्रदर्शन घडवण्यावर बंदी  असणार आहे. जालन्यात आगामी सणांच्या आणि उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हा  निर्णय घेण्यात आला आहे. 


२० तारखेपासून मनोज जरांगेंचे आमरण उपोषण


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे येत्या २० तारखेला आमरण उपोषण सुरु करणार आहेत. सगेसोयऱ्यांसह सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपली असून त्याविरोधात हे उपोषण करण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठा आरक्षण शांतता रॅली आणि जनसंवाद सभेदरम्यान सांगितले. 


आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव ?


मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस बाकीच्या मंत्रांवर दबाव आणत असतील असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून  काही मंत्री मराठ्यांवर अन्याय करत असल्याचेही ते म्हणाले. 


हेही वाचा:


आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांचा इतर मंत्र्यांवर दबाव? मनोज जरांगे यांचा आरोप, म्हणाले..