Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या गेल्या दहा महिन्यांपासून सुरु असलेलं मराठा आरक्षणाचं लोण जालन्याच्या अंतरवली सराटी गावापासून महाष्ट्रभर पसरलं. दौरे झाले, ऐतिहासिक सभा झाल्या. शांतता रॅली झाली. राज्याभरात प्रामुख्याने ९ आंदोलने आणि ५ उपोषणे झाली. आरक्षणाच्या मागण्यांसाठी आरोप प्रत्यारोपांची, प्रश्न- प्रत्यूत्तरांसाठी सरकारसह विरोधकांमध्ये चढाओढीने टीका टिप्पण्या सुरु असताना मराठा आरक्षणाची दिशा आतापर्यंत कशी होती? मनोज जरांगे यांच्या दौऱ्यांसह सभांचा घटनाक्रम कसा होता हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
पहिल्याच दौऱ्यात उपोषणस्थळी दगडफेक,लाठीमार
मराठा आरक्षणासाठी एकीकडे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दौरेही सुरु असताना मराठा आरक्षणाच्या पहिल्याच उपोषणादरम्यान हिंसक वळण लागले होते. उपोषणस्थळी दगडफेक आणि लाठीमार झाल्याने उपोषणाने आक्रमक स्वरूप घेतले होते. सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी सरकारला मनोज जरांगे यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती.
मराठवाड्यातील ५ जिल्ह्यात जरांगेचा दौरा
एकीकडे उपोषणाला सुरुवात झालेली असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा पहिला दौरा महाराष्ट्रात सुरु झाला. ३० सप्टेंबर २०२३ ला म्हणजेच १० महिन्यांपूर्वी. मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली शहरात ३० सप्टेंबर २०२३ ते ११ ऑक्टोबरपर्यंत मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हा दौरा केला. यानंतर 14 ऑक्टोबर 2023 ला ऐतिहासिक सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिलं उपोषण सोडलं. या सभेनंतर त्यांनी 7 जिल्ह्यांचा गाठीभेटी दौरा केला.
दुसऱ्या दौऱ्यात मराठवाड्यासह पश्चिम उत्तर महाराष्ट्राचा समावेश
मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या दौऱ्यात मराठवाड्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश होता. 17 ऑक्टोबर 2023 पासून 24 ऑक्टोबरपर्यंत हा दौरा केला. ज्यात मुंबई पुणे नाशिक बीड जिल्हे समाविष्ट होते.
त्यानंतर धाराशिव नगर नाशिक छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रसह 13 जिल्ह्यांचा दौरा केला.
दुसऱ्या उपोषणात सरकारची डेडलाईन वाढली
या दौऱ्यांनतर सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हलचाल न केल्याने मनोज जरांगे दुसऱ्या उपोषणाला २५ ऑक्टोबरला बसले. ३० ऑक्टोबरला माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाला. आणि त्यानंतर 02 नोव्हेंबर रोजी जरांगेंनी दुसरं उपोषण मागे घेत सरकारला 2 जानेवारीची डेललाईन दिली. मात्र, ही डेडलाईन कमी करत २४ डिसेंबर केल्याची माहिती त्यांनी दुसऱ्या दिवशी दिली.
तिसरा दौरा ८ दिवसांचा, रायगडासह पुण्यातही मराठा आरक्षणाची तोफ डागली
15 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत अशा आठ दिवसांच्या या दौऱ्यात रायगडासह पुण्याचाही समावेश होता. ज्यात त्यांनी धाराशिव,सोलापूर कोल्हापूर सांगली रायगड , सातारा नगर नाशिक, ठाणे असा दौरा करत मराठा आरक्षणाची तोफ त्यांनी डागली. या दौऱ्यादरम्यान रायगडावरील शिवरायांच्या समाधीला अभिवादन तसेच पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथील संभाजीमहाराज समाधीचे देखील मनोज जरांगे यांनी दर्शन घेतलं होतं.
चौथ्या दौऱ्यात १३ जिल्ह्यांमध्ये दौरा
1 डिसेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या काळामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी दौरा केला तेरा जिल्ह्यांचा दौरा केला . छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, बुलढाणा,अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली ,नांदेड, बीड असा दौरा केला.
वर्षाच्या शेवटी आंदोलनाची दिशा ठरवण्याची घोषणा
20 डिसेंबर 2023 ते 24 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई कृषी प्रदर्शन पासून जालना ,परभणी लातूर बीड असा दौरा केला. 23 डिसेंबरच्या बीडच्या इशारा सभेत त्यांनी २४ डिसेंबरपासून आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं जाहीर केलं.
तिसरं उपोषण अध्यादेशाची प्रत घेऊन मुंबईतून जरांगे परतले
या दौऱ्यानंतर मनोज जरांगे यांनी तिसऱ्या उपोषणाला सुरुवात केली. २० जानेवारी रोजी आंतरवली सराटीमधून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले. आणि थेट मुंबईकडे रवाना झाले. 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी सगे सोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर जरांगेंचा मार्च पुन्हा परतला.
सहाव्या आंदोलनात गोदाकाठच्या गावांचा दौरा
मनोज जरांगे यांनी 4 जानेवारी ते 8 जानेवारी 2024 या काळात गोदाकाठच्या गावांचा दौरा केला. यात जालना आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना भेटी देऊन, आंदोलनामध्ये सक्रिय होण्याचा आवाहन करण्यात आलं.
मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन मनोज जरांगेंचा मुंबई दौरा
सहा दौऱ्यांनंतर मनोज जरांगे यांनी 20 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत मुंबई दौरा काढला. आंतरवाली सराटी पासून हा दौरा सुरू झाला होता. बीड ,नगर ,पुणे लोणावळा असा त्याचा मार्ग होता. 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सगे -सोयरे अध्यादेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतला, यावेळी मनोज जरांगे यांच्यासह आंदोलकांनी गुलाल घेतला.
फेब्रुवारी महिन्यात तीन दिवसीय दौरा
मनोज जारांगे यांनी 6 फेब्रुवारी महिन्यात 6 तारखेपासून पुन्हा एकदा दौरा काढला ज्यामध्ये आळंदी ,नवी मुंबई नाशिक गेवराई(बीड ), अशा जिल्ह्याचा समावेश होता, हा दौरा 9 फेब्रुवारी पर्यंत होता.
चौथ उपोषण 8 ते 13 जून दरम्यान चाललं...
चौथ उपोषण सोडवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आले होते. त्यावेळी मागण्या मान्य करण्यासाठीं जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जून ते 13 जुलै पर्यंत वेळ दिला होता. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली...
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये शांतता रॅली
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढली, 6 जुलै रोजी हिंगोली येथून या दौऱ्याला सुरुवात झाली. 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान संपूर्ण मराठवाड्याचा त्यांनी ही शांतता रॅली काढली.
पाचव्या आमरण उपोषणाला स्थगिती
२० जुलैपासून सुरु झालेले मनोज जरांगे यांचे उपोषण आता स्थगित झाले आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. दरम्यान उपोषण सोडताना जरांगे यांनी पुन्हा सरकार ला 13 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याची मुदत वाढवून दिली आहे..