Jalna Accident: जालन्याच्याजवळ असणाऱ्या सिंदखेड राजा चौकात मोठा अपघात झाला आहे. सायकल स्वराला वाचवण्याच्या नादात सिंदखेड राजाहून नाशिकला जाणाऱ्या बसचा अपघात झालाय. या अपघातात 17 जण जखमी झाले असून यात वृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून जखमींवर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


अचानक ब्रेक दाबल्याने बसची ट्रकला धडक


बस समोर येणाऱ्या सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस उलटी फिरून मागे असलेल्या ट्रकला बस आदळली. या धडकेमुळे बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वृद्धांसह महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सिंदखेड राजा चौकात झालेल्या अपघातानंतर बसमधील प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरून बसला हलविण्यात आले.


सिंदखेडराजाहून नाशिकला जाणाऱ्या बसचा अपघात


जालन्यापासून जवळच असणाऱ्या सिंदखेडराजाहून नाशिकला जाणाऱ्या बससमोर सायकलचालक येत असल्याचे दिसताच बसचालकाने त्यास वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. यामुळे बस उलटी फिरत मागे असणाऱ्या ट्रकला आदळली. या अपघातीमुळे हादरा बसल्याने १७ जण जखमी झाले असून जालन्यात जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे.


हेही वाचा:


 IAS Pooja Khedkar : खोटे प्रमाणपत्र, मुलाखत, नियुक्ती अन् राजकीय हस्तक्षेप; पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCला 10 मोठे प्रश्न