Jalgaon News Updates: राज्यात सध्यस्थितीत शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कुणाच्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटामध्ये (CM Eknath Shinde) रस्सीखेच पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे हिंदुत्वाचे विचार नेमके कुणाचे यावरुन भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना जळगावात मात्र उद्धव ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपचे नेते एकत्र आल्याचे दिसून आले. निमित्त होते बालाजी रथाचे (Balaji Rath Yatra DharanGaon. एकीकडे राज्यातील या तिघांमधील रस्सीखेच आणि टीका टिपण्णी तर दुसरीकडे तिघे एकत्र दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.


धरणगावातील बालाजी रथाची तब्बल 125 अधिक वर्षांची परंपरा 


धरणगावातील बालाजी रथाची तब्बल 125 अधिक वर्षांची परंपरा आहे. बालाजी वहनोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही बालाजी रथोत्सव साजरा झाला. या रथोत्सवासाठी राज्याचे भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), भाजपचे विधान परिषद आमदार चंदूलाल पटेल (Chandulal Patel), भाजपचे खासदार उन्मेश पाटील,  शिवसेनेच उद्धव ठाकरे समर्थक सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh), धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी तसेच शिंदे गटाचे  पदाधिकारी भानुदास विसावे तसेच कार्यकर्ते हे सुध्दा उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. 


बालाजी रथ हा ट्रॅक्टरला जोडून हे ट्रॅक्टरची स्टेअरिंग मंत्री गिरीश महाजनांनी हातात घेतली. यावेळी त्याच्या ट्रॅक्टरवर भाजप खासदार उन्मेश पाटील यांच्यासमवेत उद्धव ठाकरे गटाचे निलेश चौधरी हे बसलेले होते. महाजन हे बालाजी रथ असलेले ट्रॅक्टर चालवताना दिसून आले. या बालाजी रथोत्सवाच्या निमित्ताने पक्षभेद, मतभेद विसरुन उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते तसेच भाजपचे पदाधिकारी एकत्र आल्याचे पहायला मिळाले.


दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच विविध मुद्द्यांवर भाजपवर तसेच त्यांच्या नेत्यांवर कडाडून टिका केल्याचं पहायला मिळालं. ही टीका ताजी असतानाच दुसरीकडे जळगावात भाजपचे मंत्री, पदाधिकारी तसेच उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र दिसून आल्याने याठिकाणी उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्याच्या होत्या.


इतर महत्वाच्या बातम्या