Jalgaon News Update : जळगावमधील आमदार किशोर पाटील (Kishor Patil) आणि त्यांची चुलत बहीण वैशाली सुर्यवंशी यांच्या राजकीय वाटा वेगळ्या आहेत. भाऊ शिंदे गटात तर बहीण उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत. दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी भाऊ आणि बहिणीचं नातं जपल्याचं रक्षाबंधन सणाच्‍या दिवशी पहायला मिळालं. बहीण वैशाली सुर्यवंशी यांनी भाऊ आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी जात राखी बांधली. बहीण वैशाली सुर्यवंशी यांनी भाऊ किशोर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले, तर भाऊ आमदार किशोर पाटील यांनीही बहिणी वैशाली यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं यावेळी पहायला मिळालं. जळगावमध्ये बहीण-भावाची चर्चा सुरु आहे. 


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सेनेचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात जाणे पसंत केले होते. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या चुलत भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाशी एक निष्ठ असल्याचं सांगत सक्रीय राजकारणात सहभाग घेतला होत. यामुळे भाऊ आमदार किशोर आपा पाटील हे शिंदे गटात तर बहीण वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरे यांच्या गटात असं चित्र उभे राहिल्याने पाचोरा येथे भावापुढे बहिणीने आव्हान उभे केल्याचं पाहायला मिळाले होते. 


बहिणीने आव्हान दिल्याने ही बाब आपल्या साठी दुर्दैवी असल्याचं किशोर पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र राजकारण करत असताना अनेक राजकीय परिवारात अशी उदाहरणे घडली असल्याने आपल्याला त्यात नवल वाटत नसल्याचं म्हटलं होतं, यापुढे राजकारणात आपण बहिणीच्या आव्हानाकडे राजकीय दृष्ट्या पाहणार असून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र हे करीत असताना राजकारणात राजकारण करत असताना बहीण-भावाच नातेही कायम राखणार असल्याचं आमदार किशोर पाटील यांनी म्हटल होतं. त्यांच्या या वक्तव्याप्रमाणे त्यांनी आज आपल्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून राखी बांधून आपला बंधूभाव आजही कायम असल्याचं दाखऊन दिले आहे.


महत्वाच्या बातम्या 


Jalgaon : भाऊ शिंदे गटात तर बहिण शिवसेनेत, बहिणीने भावाकडून शिवसेनेचं कार्यालय घेतलं परत