जळगाव : अमेरिकेतील शेती आणि तेथील शेतकऱ्यांना जाणून घेण्यासाठी ना.धों. महानोर (N D Mahanor) हे पहिल्यांदा भारताबाहेर पडले. त्यावेळी पोशाखाची अडचण होती. कारण हे नेहमी शर्ट आणि पायजमा घालायचे, मात्र त्यावेळी महानोर यांनी पहिल्यांदा पॅन्ट आणि टी-शर्ट घातला. असा किस्सा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महानोर यांच्या आठवणीचां सांगितला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आज जामनेर (Jamner) तालुक्यातील पळासखेडा या ठिकाणी पद्मश्री ना धो महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ना.धों. महानोर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यावेळी म्हणाले की, ना.धों. महानोर यांच्याशी जास्तीत जास्त चर्चाही शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था व त्यांच्या समस्या या विषयावर होत असे. शेती विषयीची महानोर यांची जास्त माहिती होती. शेतशिवारावर, शेताच्या पिकावर त्यांची जी आस्था होती. त्यांची जी बांधील की होती, त्यावर चर्चा होऊ शकत नाही. अमेरिकेतील (America) शेती आणि तेथील शेतकऱ्यांना जाणून घेण्यासाठी ना.धों. महानोर हे पहिल्यांदा भारताबाहेर पडले. त्यावेळी पोशाखाची अडचण होती. कारण हे नेहमी शर्ट आणि पायजमा घालायचे, मात्र त्यावेळी महानोर यांनी पहिल्यांदा पॅन्ट आणि टी-शर्ट घातला. असा किस्सा शरद पवार यांनी महानोर यांच्या आठवणीचां सांगितला. 


शरद पवार पुढे म्हणाले की, पत्नीच्या निधनानंतर महानोर हे एका दृष्टीने आयुष्यात कोसळले होते. पत्नी नसल्याचे मोठे दुःख त्यांना होतं आणि ते त्यांना सहन करता आलं नाही आणि त्यामुळे त्यांची जगण्याची इच्छा नसल्याचं मला वाटत होतं. महानोर यांच्या जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. साहित्य काव्याने लेखन या सर्व गोष्टींवर महानोर यांच्या नसल्याने मोठा आघात झाला आहे. महानोर यांच्या रूपाने काव्याच्या क्षेत्रातला जबरदस्त कवी जबरदस्त साहित्यिक, शक्तिशाली विचारवंत हा महाराष्ट्राला मिळाला होता. अशा दूरदृष्टी असलेल्या साहित्यिकाला विचारवंताला संपूर्ण महाराष्ट्र हा मुकला असल्याचे पवार म्हणाले. 


'ती' भेट शेवटची ठरली.... 


तसेच महानोर यांच्या कार्य आणि त्यांचे साहित्य हे संपूर्ण जगाला माहित आहे. महानोर यांच्या साहित्याची आणि त्यांच्या काव्याची तुलना होऊ शकत नाही. नवीन पिढी महानोर यांच्या काव्यातून त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेईल. आणि ज्या पद्धतीने महानोर यांनी जबरदस्त कवी, जबरदस्त साहित्यिक म्हणून जो इतिहास निर्माण केला. त्या पद्धतीनेच नवीन पिढी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवील आणि त्या पद्धतीने वाटचाल करेल, हीच महानोर यांच्यासाठी मोठे आदरांजली असेल. एका वृत्तवाहिनीच्या हस्ते महानोर यांचा सन्मान केला जाणार होता. या सोहळ्याला महानोर येणार नव्हते, मात्र ज्यावेळी त्यांना कळलं की हा पुरस्कार माझ्या म्हणजे शरद पवार यांच्या हस्ते मिळणार आहे. त्यावेळी महानोर अगत्याने आले. त्यांनी यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या कविता ऐकवल्या आणि हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा सन्मान ठरला. आणि या सन्मानाच्या निमित्ताने महानोर यांच्याशी झालेला माझा संवाद सुध्दा शेवटचा ठरला आणि तो माझ्या अखेरपर्यंत स्मरणात राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.