Jalgaon News : मुंबई येथील बालेगाव कॅम्प परिसरात एसआरपीएफ भरती परीक्षा घेण्यात आली होती. या भरती दरम्यान जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे या तरुणाचा धावताना खाली कोसळून मृत्यु झाल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर अक्षय बिऱ्हाडे यावर वेळीच प्राथमिक उपचार करण्यात न आल्याने त्याचा मृत्यु झाला असल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियाकडून केला जात आहे. तसेच या घटनेस स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. परिणामी, या घटनेची चौकशी करत यातील दोषी वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत अक्षय बिऱ्हाडे याच्या कुटुंबियांनी आता केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वचे ठरणार आहे.  


पोलीस भरतीतील मैदानी चाचणीत तरुणाच्या दुर्देवी मृत्यू


जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील अक्षय मिलिंद बिहाडे हा युवक 27 जूनला पोलिस भरतीसाठी बालेगाव येथे गेला होता. दरम्यान 29 जूनला मैदानी चाचणीसाठी धावत असताना 3-4 किमीनंतर त्याला भोवळ आल्याने तो अचानक जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यात त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एकच टाहो फोडला. अक्षय हा त्याच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचा उदर निर्वाह अवलंबून होता. तो आता गेल्याने त्याच्या परिवाराचा उदर निर्वाह प्रश्न निर्माण झाल्याने, शासनाने त्याच्या परिवाराचे पुनर्वसन करावे, सोबतच त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी शासनाने भरती ठिकाणी आवश्यक त्या सुविधा पुरेशा प्रमाणांत उपलबध करून द्याव्या, जेणे करून पुन्हा एकदा कोणत्याही अक्षयचा अशा पद्धतीने मृत्यू होणार नाही, अशी अपेक्षाही मृत अक्षय बिऱ्हाडे यांच्या कुटुंबियाकडून केली आहे. 


कुटुंबियावर दु:खाचा डोंगर


मृत अक्षय हा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षाला होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आपले भविष्य घडवून घरची परिस्थिती सुधारण्याची अक्षयची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी तो गेल्या कित्येक वर्षापासून पोलीस भारती आणि अन्य परीक्षांची तयारी करत होता. दरम्यान 27 जूनला पोलीस भरतीसाठी मुंबईतील बालेगाव येथे तो गेला होता. दरम्यान 29 जूनला मैदानी चाचणीसाठी धावत असताना अचानक तो कोसळला आणि उपचार दरम्यान त्यात त्याचा मृत्यू झाला. घरचा आधार आणि एकुलता एक मुलगा अशा पद्धतीने निघून गेल्याने बिऱ्हाडे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या