Shiv Sena vs BJP in Jalgaon : जळगावमध्ये शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दोन दिवसांत भाजपच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगरसेवक तर गेलेच त्यात भर म्हणून जळगाव मनपामध्ये शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे. 


शनिवारी  जळगाव मनपामध्ये भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारीच चार नगरसेवकांन भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. दोन दिवसात भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.  शनिवारी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. भाजप बंडखोर, एमआयएमसह असे 42 जणांचे संख्याबळ शिवसेनेकडे झाले आहे. जळगाव मनपामध्ये 75 जागा आहेत. संख्याबळ पुरेसे असल्यामुळे शिवसेनेने जळगाव मनपावर झेंडा फडकावला आहे. 


मागील काळात भाजपाला बहुमत मिळाले होते, मात्र आघाडी सरकार आल्यापासून सुत्रे फिरली आहेत. राज्यातील सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अनेक भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण काही दिवसानंतर त्यांची पुन्हा घरवापसी झाली होती. त्यामुळे जळगाव मनपामध्ये महापौर शिवसेनेचा आणि बहुमत भाजपचे अशी परिस्थिती झाली होती.  पण आता पुन्हा एकदा शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ झाले आहे. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप हा विकासकामांना विरोध करत असल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. 


जळगाव मनपामध्ये भाजपने सुरेश जैन यांच्या खानदेश विकास आघाडीची सत्ता उलथविण्याचा यश मिळविले होते. 75 पैकी 57 जागावर स्पष्ट बहुमत मिळवित भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला होता.  
 
मात्र नंतर चे काळात राज्यात भाजपा आणि सेनेचे युतीची सत्ता गेल्यावर जळगाव शहराच्या विकास कडे भाजप चे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने सेनेने जनतेची नाराजी ओळखत भाजपचे काही नगर सेवक आपल्या गळाला लाऊन जळगाव मनपा वर भगवा फडकवला होता,मात्र मधल्या काळात पुन्हा भाजपा ने सेनेचे काही नगर सेवक आपल्या कडे वळविण्यात आल्याने जळगाव मनपा वर सेनेचा महापौर तर भाजप चे बहुमत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर अनेक भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सेनेचे 22, भाजपा बंडखोर 24, एमआयएम 3, भाजपा 31असे संख्या बळ झाले आहे. 


जळगाव मनपामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना यश मिळाले आहे, तर भाजपा सह गिरीश महाजन यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.