Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे विजयी झाले आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र भैय्या पाटील यांचा पराभव केला आहे. हा एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास  आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.


संजय पवार यांना मिळाली 11 मते


राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी बंडखोरी करत आयत्यावेळी शिंदे गटाच्या मदतीने अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. अखेर या निवडणुकीत झालेल्या गुप्त मतदानात संजय पवार यांना 11 मते मिळाल्यानं अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्याच पडली आहे. संजय पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


 21 पैकी 11 मतदान मते संजय पवारांना तर 10 मते रविंद्र भैय्या पाटलांना


जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आल्याच्या घोषणा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्याच संजय पवार यांनी यांनी शिंदे गटाची मदत घेत आपला उमेदवारी अर्ज भरल्याने जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादी पक्षातच बंडखोरी झाल्यानं गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये 21 पैकी 11 मतदान हे संजय पवार यांना तर 10 मतदान हे रविंद्र भैय्या पाटील यांना पडले. त्यामुळं चुरशीच्या झालेल्या या लढतीत एका मताने संजय पवार यांचा विजय झाला आहे. अखेर या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ अखेर संजय पवार यांच्या गळ्यात पडली आहे. 


शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटली, खडसेंची प्रतिक्रिया


दरम्यान, या सर्व प्रकारावर बोलताना एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे की, सर्वांना एकत्र ठेवण्यात आम्हाला अपयश मिळालं. काँग्रेसची मत फुटली, आमच्यातच गद्दारी झाली. आमचा नाईलाज झाला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटली महाविकास आघाडीतील लोकांकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळं या निवडणुकीत आम्हाला धोका पोहोचल्याचे खडसे म्हणाले.


जिल्हा बॅकेत 20 वर्षांनतर न्याय मिळाला : संजय पवार 


विरोधी पक्षनेते अजित पवार हे माझे नेते आहेत. सहकारात पक्ष नसतो. मात्र, या निवडणुकीत मला भाजपचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे नेते तसेच भाजपचे आमदार या सर्वांनी मला मदत केली. खऱ्या अर्थाने जिल्हा बॅकेत मला 20 वर्षांनतर न्याय मिळाला आहे. मी समाधानी असल्याचं प्रतिक्रिया नवनियुक्त्त अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाचा देवकरांचा राजीनामा, नवा अध्यक्ष कोण?