Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप करत, बारा मुद्द्यांचे पत्र ठाकरे गटाकडून आयोगाला लिहिलं आहे. 


निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगानं चिन्हासंदर्भात जे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये उघडउघडपणे पक्षपातीपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगानं जाणून-बुजून दुसऱ्या बाजूला कळतील, अशा पद्धतीनं वेबसाईटवर टाकले, असा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळं शिंदे गटाला आमची सगळी रणनिती कळाली, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. 


निवडणूक आयोगानंच आमची सगळी रणनीती शिंदे गटाकडे उघड केली. आमच्याच यादीतील चिन्ह आणि नावाचे पर्याय शिंदे गटानं कसे सादर केले? हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीमुळंच शक्य झालं, असा आरोपही ठाकरे गटानं या पत्रातून केला आहे. 


थोड्या वेळापूर्वी हे तक्रार पत्र ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात सादर केले.