महाराष्ट्रातल्या कोयना धरणाची क्षमता 119 टिएमसी आहे. तर कर्नाटकातल्या आलमट्टी धरणाची क्षमता आहे 123 टिएमसी. 2005 साली सांगली कोल्हापूरात पूर आल्यावर दोन राज्यांमधील तज्ज्ञांनी मिळून आलमट्टीमुळे महाराष्ट्रात पुर येतो का? याचा अभ्यास केला.
हा अभ्यास करताना आलमट्टीवर अवलंबून असलेल्या शेती, पिण्याच्या पाण्याची आणि ओद्योगिक गरज लक्षात घेवून आलमट्टीत 518.50 मीटर इतके पाणी साठवून ठेवण्याची परवानगी देण्यात आली. एवढी पातळी जर राखली तर धरणात 110 टिएमसी पाणी राहते. सांगली आणि कोल्हापूरात अतिरिक्त पाऊस व्हायला 30 तारखेपासून सुरुवात झाली. जलसंधारण विभागाने पंचगंगा आणि कृष्णेच्या पुरनियंत्रण रेषेच्या आत झालेल्या बेकायदेशीर बांधाकामांवर पुराचे खापर फोडले आहे. याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाने आलमट्टी धरणातल्या पाण्याच्या पातळीची अधिकृत आकडेवारी पाहिली.
25 जुलैला आलमट्टी धरणात 519.18 मीटर इतके पाणी होते.
30 जुलैला 519.20 मीटर इतके पाणी होते.
सांगली कोल्हापुरात पुर येवू लागल्यावर म्हणजेचे २ ऑगस्टला आलमट्टीतल्या धरणातली पाणी पातळी 518.41 मीटर इतकी होती.
3 ऑगस्टला 518.31 मीटर इतके पाणी होते.
4 ऑगस्टला 518.15 मीटर इतके पाणी होते.
5 ऑगस्टला 517.87 मीटर इतके पाणी होते.
6 ऑगस्टला 517.67 मीटर इतके पाणी होते.
7 ऑगस्टला 517.26 मीटर इतके पाणी होते.
8 ऑगस्टला 517.10 मीटर इतके पाणी होते.
9 ऑगस्टला 517.08 मीटर इतके पाणी होते.
10 ऑगस्टला 517.30 मीटर इतके पाणी होते.
याचाच अर्थ 2005 साली ठरलेल्या 518.50 मीटर पाणी पातळीपेक्षा आलमट्टी धरणात पाणी पातळी वाढली नव्हती. तसेच पूर ज्या काळात आला, त्या काळातही धरणात पाणी अधिक साठवले नव्हते. त्यामुळेच महापुराचं खापर आलमट्टी धरणावर फोडणे चुकीचे ठरेल. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा आणि पंचगंगेच्या खोऱ्यातील बेकायदा बांधकामं ही पुराला कारणीभूत असण्याची शक्यता अधिक बळावते.
व्हिडीओ पाहा