Satej Patil on Tata Airbus Project : राज्याच्या वाट्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रणंकदन सुरु झाले आहे. तीन महिन्यात तीन प्रकल्प गेल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांनी चौफेर टीका केली आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का? अशी शंका येत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. राज्याला मागं ढकलण्याचा प्राधान्यक्रम या सरकारचा असल्याचा घणाघात त्यांनी केला. मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन कमी पडतं हे आता लोकांना कळलं आहे. देशाचं सरकार एका राज्यासाठी चाललय का असा प्रश्न निर्माण होत आहे. डायमंड इंडस्ट्री, बुलियन ट्रेडिंग असे अशा महत्त्वाच्या केंद्र गुजरातला गेली, त्यामुळे गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का अशी शंका आहे.
देशाची सगळी संपत्ती एका राज्यात घेऊन जाण राज्यावर अन्यायकारक आहे, एअरलाईन्सचे प्रमुख ऑफिस मुंबईहून नोएडाला गेले, मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचे ते म्हणाले.
तर थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असतं
यावेळी सतेज कोल्हापूर शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या थेट पाईपलाईन योजनेबाबत माहिती दिली. पाऊस लांबला नसता तर थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असतं असे त्यांनी सांगितले. राहिलेलं कामही पूर्ण करू, सरकार म्हणून ते मदत करणार असतील तर काही अडचण नाही, पण आता फार मदत लागेल अशी परिस्थिती नाही. काम थांबल्यास मी सुद्धा त्यांना सांगेन, असेही ते यावेळी म्हणाले.
शहराची खड्ड्यांमुळे विदारक अवस्था झाली आहे. महापालिकेतील अभियंत्याची आईचाही खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी नसणे हे शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांनी महापालिका निवडणुका न झाल्याचा परिणाम विकासकामांवर दिसत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने देखील यासाठी अजून निधी द्यावा.
इतर महत्वाच्या बातम्याच्या