Girish Mahajan Medical Education in Marathi : वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical Education) हिंदीतून (Hindi) उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश (Madhy Pradesh) सरकारचा निर्णय ताजा असतानाच आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण (Marathi Medical Education) घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबतची मोठी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल.


एमबीबीएससह या शाखांचा अभ्यास मराठीतून
 
यामुळे आता एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.


मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात राज्य भाषेत म्हणजेच मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वच पॅथी, एमबीबीएस पर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं महाजन यांनी यावेळी सांगितलं आहे. ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर करावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याता आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असंही महाजन म्हणाले आहेत.


पाहा व्हिडीओ : काय म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन



मराठीतून शिक्षण घेणे बंधनकारक नाही


राज्य सरकारकडून नव्या शैक्षणिक वर्षापासून मराठी वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग काहीसा सोपा होणार आहे. पण वैद्यकीय शिक्षण मराठीत घेणे बंधनकारक नसेल. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार, हवी ती भाषा निवडण्याची मुभा असेल.


टाटा एअर बस प्रकल्पाबद्दल बोलणं टाळलं


टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातकडे वळवल्यामुळे विरोधकांची टीकेची झोड उठली असून मात्र गिरीश महाजन यांनी याबाबत बोलणे टाळले असून यावर मुख्यमं,त्री उद्योग मंत्री बोलत असून मी याबाबत फारसा बोलणं उचित होणार नाही, असं सांगत गिरीश महाजन यांनी गुजरातकडे वळवलेल्या प्रकल्पाबाबत बोलणे टाळले आहे. 


वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य


भोपाळमध्ये (Bhopal) वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ (Medical Education in Hindi) करण्यात आला आहे. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शाह यांच्या हस्ते पार पडलं.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI