धुळे : महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्याने आणि राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यामुळे संप मागे घेतल्याचा दावा पुणतांबा कोअर कमिटीचे सदस्य धनंजय जाधव यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात उभी फूट पडल्यानंतर संपर्काबाहेर गेलेले किसान क्रांती मोर्चाचे धनंजय जाधव यांना 'एबीपी माझा'ने गाठलं. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत मॅनेज झाल्याचा आरोप जाधवांनी पूर्णपणे फेटाळला आहे.

सध्याच्या संपाशी आमचा संबंधं नाही
फक्त संप करणं उद्दिष्ट नव्हतं, मागण्या मान्य करणं महत्त्वाचं होतं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमचं समाधान झालं. आमच्या आंदोलनाला यश मिळालं. 70 टक्के मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्ही संप मागे घेतला. सध्या सुरु असलेल्या संपाशी आमचा संबंध नाही, असंही धनंजय जाधव यांनी जाहीर केलं.

संप सुरु ठेवण्यात काहींचा राजकीय डाव
संपावर कुठेतरी तोडगा काढणं गरजेचं होतं. पकायदा-सु्व्यवस्थेचा विचार करुन आम्ही संप मागे घेतला. शेतकऱ्यांचा संप सुरु ठेवण्यात काही जणांचा राजकीय डाव असू शकतो, असंही धनंजय जाधव म्हणाले.

तसंच जयाजी सूर्यवंशी यांनी माझ्यावर केलेले आरोप त्यांच्यावर आलेल्या दबावामुळेच आहेत, असाही दावा धनंजय जाधव यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला.

अजित नवलेंची भूमिका तडजोडीची नव्हती

शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ फितूर झाले. आता फितुरांचे कोणी ऐकणार नाही कोअर कमिटीचे सदस्य अजित नवले म्हणाले होते. त्यांच्याविषयी धनंजय जाधव म्हणाले की, नवले यांची भूमिका अजिबात तडजोडीची नव्हती. बैठकीत काही ऐकून घेण्याचीही त्यांची मनस्थिती नव्हती.

मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी शेतकऱ्यांची लढाई आधी लढणार आहे, असं सांगत लवकरच पुणतांब्याला जाणार असल्याचं धनंजय जाधव म्हणाले.

पाहा संपूर्ण मुलाखत



संबंधित बातम्या

पुणतांब्यातील कोअर कमिटीच्या विरोधात शेतकऱ्यांचं मुंडन आंदोलन

शेतकरी संपावर : शेतकऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरुच

शेतकरी संपात फूट पाडल्याच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु : जयाजी सूर्यवंशी