मुंबई : देशात आरक्षणाचा पाया रचणारे, समतेचा राजा आणि करवीर नगरीचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील पुतळा पाहून शाहूप्रेमींच्याच नव्हे तर अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील जनतेच्या कडेलोट झाला आहे. महाराजांचे ज्या पद्धतीने बलदंड व्यक्तीमत्व होते त्यामधील एकही छबी महाराष्ट्र सदनातील पुतळ्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराजांचा पुतळा आहे त्याच पद्धतीने नव्याने बसवावा, अशी अशी मागणी होत आहे. 


दुरुस्ती असेल ते पाहून घेऊ आणि निर्णय घेऊ


या सर्व पार्श्वभूमीवर आज विधानसभेमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्यावरून पडसाद उमटले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी काय दुरुस्ती असेल ते पाहून घेऊ आणि निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा उपस्थित केला व बदललेला पुतळा लावल्याचा आरोप केला. कोल्हापुरात दसरा चौकामध्ये ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा पुतळा आहे त्याच पद्धतीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये पुतळा बसवा, अशी शाहप्रेमींची मागणी असल्याचे ते म्हणाले. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी पाहून निर्णय घेऊ असे असे आश्वासन दिले. मंत्री शंभूराज देसाई यांनी  कोल्हापूरमधील शाहू महाराजांच्या पुतळ्या संदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, याबाबत चौकशी करून नागरिकांच्या मताप्रमाणे तो पुतळा होईल असे सांगितले. 


दसरा चौकातील महाराजांचा पुतळा पाहून निर्णय घ्यावा


दरम्यान दिल्लीत महाराष्ट्र सदनात शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 4 जून 2013 रोजी झाले होते. मात्र, या पुतळ्याला पाहिल्यानंतर अनेक त्रुटी दिसून येतात. त्यामुळे हा पुतळा बदलण्यात यावा अशी मागणी शाहूप्रेमी जनतेमधून होत आहे. पुतळ्याबाबतची अनास्था दिसून आल्यानंतर कोल्हापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 


खासदार शाहू छत्रपती यांनी महाराष्ट्र सदनातील शाहू महाराजांचा पुतळा सुसंगत नसल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले की पुतळा सुसंगत नाही ही वस्तुस्थिती आहे. या पुतळ्यासाठी निवड समितीला चांगला कलाकार मिळाला नाही असे दिसते.0 हा पुतळा बदलला पाहिजे यात शंकाच नाही. समितीने कोल्हापुरातील दसरा चौकातील महाराजांचा पुतळा पाहून निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 


इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी सुद्धा पुतळ्याचा फोटो पाहून अतिशय वाईट वाटल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शाहू महाराजांचा पुतळा करताना कोल्हापुरातील दसरा चौकातील पुतळ्याचे मॉडेल समोर ठेवण्याची गरज आहे आणि पुतळा बदलला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या