Inflation:  महागाईचा प्रभाव कुठे दिसतो आहे? या प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल तर ग्राहकांनी आपली खरेदी किलोवरून पावकिलोवर आणली आहे, यावरुन ते लक्षात येतं. अनेक ग्राहक महिन्यातून तीन चार वेळेस किराणा खरेदी करत आहेत. ग्राहकांना महागाईच्या माराचा सामना करावा लागत आहे, सोबतच ज्यांनी या महागाईच्या काळात नवीन किराणा दुकान (grocery Store) सुरू केले त्यांना देखील यामुळं फटका बसतोय. 


कसा ते जाणून घेऊयात...


महागाई वाढू लागल्यानंतर मोठ्या कंपन्यांनी नवी क्लुप्ती लढवली आहे. वाण सामानाची पॅकिंग किलो वरून पाव किलो, अर्धा किलो केली आहे. अनेक ग्राहक जे आधी तीन ते साडेतीन हजाराचा किराणा माल खरेदी होते परंतु ते आज दीड हजार रुपयांचा किरणा खरेदी करू लागले आहेत. 


गेल्या दोन वर्षात वाण सामानाचे दर कसे वाढत गेले याची यादी 


2020 साली 


साखर 3100 ते 3200
खाद्य तेल 100 ते 105 रुपये किलो
शेंगदाणे 80 ते 90 रुपये किलो
तूरडाळ  80 ते 90 रुपये किलो
मुगडाळ 88 ते 90 रुपये किलो
मसुर डाळ 75 ते 80 रुपये किलो
हरभरा डाळ 50 ते 55 रुपये किलो
टूथपेस्ट 100 ग्राम 50
मीठ 18 रुपये किलो
तांदूळ 30 ते 40 किलो
गहू 2200 ते 2500 रुपये क्विंटल
ज्वारी 1500 ते 2000 रुपये क्विंटल
डिटर्जंट पावडर 46 ते 65 रुपये किलो 
धुलाई साबण  पॅक 240 रुपये 
अंगाचे साबण 18 ते 25 रुपये नग
खोबरेल तेल 200ml 82 रुपये


तर याच वस्तू 2022 साली 


साखर 3600 ते 3800
खाद्य तेल 140 ते 160 रुपये किलो
शेंगदाणे 105 ते 140 रुपये किलो
तूरडाळ  95 ते 110 रुपये किलो
मुगडाळ 90 ते 100 रुपये किलो
मसुर डाळ 90 ते 100 रुपये किलो
हरभरा डाळ 60 ते 65 रुपये किलो
टूथपेस्ट 100 ग्राम 60
मीठ 25 रुपये किलो
तांदूळ 50 ते 60 किलो
गहू 3000 ते 3500 रुपये क्विंटल
ज्वारी 2500 ते 3000 रुपये क्विंटल
डिटर्जंट पावडर 58 ते 78 रुपये किलो 
धुलाई साबण  पॅक 310 रुपये 
अंगाचे साबण 25 ते 35 रुपये नग
खोबरेल तेल 200ml 90 ते 100 रुपये
 
महागाईच्या वाढत्या फेऱ्यात फक्त वाण सामानाचं नाही गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल, सीएनजीचे दर, भाजीपाला याचाही समावेश आहे. ग्राहक परेशान आहेत आणि  किलोऐवजी पावकिलोत खरेदी करू लागले आहेत.