Uday Samant : विधानसभेतील आमदार निलेश राणेंच ( MLA Nilesh Rane) पाहिलं भाषण सुरू होताना मी घाबरलो होतो. कारण विधानसभेच्या बाहेरील भाषण ऐकूण ते काय बोलणार याकडे लक्ष होतं असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केलं. पण निलेश राणेंच भाषेवरील प्रभुत्व पाहून आणि आपल्याच सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असावा याचा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा असल्याचे उदय सामंत म्हणाले. निलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आले होते. यावेली ते बोलत होते.
आमदार निलेश राणे मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा चालवू शकतात
आमदार निलेश राणे प्राध्यापक मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा विधानसभेत चालवू शकतात, असे उदय सामंत म्हणाले. विधानसभेच्या बाहेरील भाषण ऐकूण विधानसभेत पहिल्यांदाच भाषणाला उभे राहिलेल्या निलेश राणे यांच्या भाषणावेळी मी घाबरलो होतो. नितेश राणेंच इतक भाषेवरील प्रभुत्व विधानसभेत पहिल्या भाषणावेळी बघायला मिळालं. आपलं सरकार असताना सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असावा हे निलेश राणेंनी दाखवून दिल्याचे सामंत म्हणाले. नारायण राणेंचे गुण निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये असल्याने राज्यात हे भूषण असल्याचे सामंत म्हणाले.
कोकणात राणेंची ताकद वाढली
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कोकणात दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला. रायगडमधून अनंत गिते पराभूत झाले. तर, रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक आणि राजन साळवी यांना पराभव स्वीकारावा लागला. वैभव नाईक यांना निलेश राणेंनी पराभूत केलं. तर, राजन साळवी यांना पराभूत करत किरण सामंत विजयी झाले होते. कोकणातून केवळ भास्कर जाधव विजयी झाले आहेत. दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील निलेश राणे यांच्या समर्थकांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, कोखणात राणेंची ताकद वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. स्वत: नारायण राणे हे खासदार आहेत, तर त्यांची दोन्ही मुले ही नितेश राणे आणि नारायण राणे हे आमदार आहेत. नितेश राणेंना यावेळी मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे. त्यामुळं कोकणात राणेंचं वर्चस्व वाढताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: