नागपूर : देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी येत्या डिसेंबरपासून राबवण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या पॉलिसीसाठी देशातील पहिला पायलट प्रकल्प नागपूरमध्ये 27 मे रोजी लॉन्च होणार आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी अंतर्गत नागपूरमध्ये 27 मे रोजी 200 इलेक्ट्रिक टॅक्सी लॉन्च करण्यात येणार आहेत.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन 2020 अंतर्गत हा पहिलं मल्टि मोडल इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोजेक्ट आणि ओला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असा प्लॅन तयार केला आहे. हे देशातील पायलट प्रोजेक्ट आहे, तसंच पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासाठी उचललं गेलेलं पहिलं पाऊल आहे.

nag electric 2 new


एकीकडे देशात इलेक्ट्रिक मोबिलिटी 2020 पर्यंत आणायची आहे तर रस्त्यावरील प्रत्येक वाहन हे 2030 पर्यंत इलेक्ट्रिक असावे असे महत्वाकांक्षी प्लॅन भारत सरकारचा आहे. पर्यावरण आणि इंधन फायदा या प्रकल्पाद्वारे साधता येणार आहे.

100 इलेक्ट्रिक वाहनांमुळे 137 टन कार्बन डाय ऑक्साईड बनण्यापासून रोखता येतो.

100 इलेक्ट्रिक वाहनं 6514 झाडं लावण्याच्या बरोबरीचं आहे.

नागपूरमध्ये चालवली जाणारी ही गाडी 7 तास 20 मिनिटे चार्ज केल्यावर 140 किलोमीटर चालते. देशात ठिकठिकाणी पीपीपी बेसिसवर 1200 चार्जिंग पॉईंट्स लावण्यात आले आहे. जो प्लॅन देशासाठी करण्यात आला आहे, त्याप्रमाणे 2030 मध्ये 3.9 लाख कोटीची इंधन बचत सुचवण्यात आली आहे.