मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात करणार आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी को विन अॅपची देखील सुरू करणार आहेत. कोरोना लस देशभरात पोहोचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींना सध्या मंजुरी देण्यात आली आहे. 16 तारखेला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करतील. ही जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहिम आहे. देशातील सर्व राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 3006 लसीकरण केंद्रांमार्फत हे लसीकरण होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी प्रत्येक सेंटरवर 100 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.


कोरोना लसीकरणासाठी राज्याची तयारी, प्रमुख दहा मुद्दे


● 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करतील. ही जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहिम आहे.


● यासाठी सिरम इन्स्टीट्यूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.


● राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे 20 हजार डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. राज्यात 358 केंद्रांवर लसीकरण होणार  आहे.


● भारत बायोटेक कडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील 6ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये व 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.


● केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे.त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे.


●सदर लसीचे 2 डोस 4 आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत,प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री, AD Syringes तसेच AEFI Kit उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधीत कर्मचा-यांना प्रशिक्षण ही देण्यात आले आहे.


● केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा सुरु झाला असून सध्या पुरवठा करण्यात आलेल्या डोसेस नुसार 285 ठिकाणी व्हॅक्सीनेशन सेशनस आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्येक लाभार्थीला लसीचे 2 डोस 4 ते 6 आठवड्याच्या अंतराने देण्यात येणार आहे.


● टप्प्याटप्याने केंद्र शासनाकडून नोंदणी केलेल्या सर्व आरोग्य कर्मचा-यांसाठी आवश्यक असलेली लस पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी या लसीच्या २ डोसने संरक्षित होणार आहेत. व यासाठी लसीचा साठा केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे.


● नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसेच खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


● देशातील सर्व राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 3006 लसीकरण केंद्रांमार्फत हे लसीकरण होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी प्रत्येक सेंटरवर 100 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.


Corona Vaccination : पंतप्रधान मोदी 16 तारखेला करणार लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी