मुंबई : गेल्या 67 दिवसांपासून सुरू असलेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा आज (17 मार्च) समारोप शिवतीर्थावरती होत आहे. या निमित्ताने इंडिया आघाडी एक प्रकारे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. इंडिया आघाडीची आज शिवाजी पार्क मैदानामध्ये भव्य सभा होत असून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी देशभरातून इंडिया आघाडीचे नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आजच्या सभेतून सत्ताधारी भाजपवर घणाघाती प्रहार करून प्रचाराचा नारळ फोडला जाईल असेच संकेत मिळत आहेत.






शिवाजी पार्क सभेवरती होणाऱ्या सभेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलं आहे. या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहणार असून त्याचबरोबर देशभरातील इंडिया आघाडीचे नेते सुद्धा या सभेमध्ये दाखल झाले आहेत.तमिळनाडूचे मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते या सभेसाठी उपस्थित आहेत. 






शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने प्रचाराचा बिगुल सुद्धा वाजला आहे. दरम्यान या सभेमध्ये विरोधक सत्ताधारी भाजपला कोणते प्रश्न उपस्थित करणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळात लक्ष असेल. 






गेल्या काही दिवसांपासून देशांमध्ये निवडणूक रोखे हा कमालीचा तापलेला मुद्दा आहे. निवडणूक रोख्यांमधून सर्वाधिक पैशाची बरसात भाजपवर झाली आहे. त्यामुळे या सभेच्या निमित्तातने प्रहार केला जाईल अशी चिन्हे आहेत. दरम्यान, या सभेमध्ये सभेला संबोधन करण्यापूर्वी राहुल गांधी हे शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या