- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
LIVE UPDATES | उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमामधील विजय स्तंभाला अभिवादन
LIVE UPDATES | उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमामधील विजय स्तंभाला अभिवादन
कशेडी घाटात ट्रॅव्हल्स 20 फुट दरीत कोसळली, आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, काही प्रवाशी जखमी सावधान...! यंदा थर्टी फस्टला दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची ब्लड टेस्ट, सहकाऱ्यांवरही गुन्हा! संजय राऊत यांच्याकडे असलेली भाजपच्या 120 लोकांची यादी ईडीला सोपवावी : रामदास आठवले गोंधळून जाऊ नका! देशभरात नवीन वर्षापासून फॉस्टॅग अनिवार्य, मुंबईत मात्र 26 जानेवारीपर्यंत मुभा देशभरासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिकसह खेळ आणि मनोरंजनाबाबत महत्वाचे अपडेट्स सोबतच दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 2021 06:54 AM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला अभिवादन
सातारा : महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी खासगी बसला अपघात, बसमधील प्रवासी जखमी, पोलीस घटनास्थळाकडे रवाना, संपूर्ण घाटातील वाहतूक थांबवली
केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लस उपलब्ध झाल्यावर प्रभावी वितरणाचे तयारी करण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव शे. राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड -19 च्या लसीकरणासाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. सर्व राज्यांचे सचिव (आरोग्य), एनएचएमचे एमडी आणि सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे अन्य आरोग्य प्रशासक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
2 जानेवारी 2021 रोजी (शनिवारी) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारकडून ड्राय रन घेण्यात येणार आहे. हा उपक्रम सर्व राज्य राजधानींमध्ये कमीतकमी 3 ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. काही राज्यांमध्ये अशा जिल्ह्यांचा देखील समावेश असेल जे कठीण भागात वसलेले आहेत/कमी दळणवळणाची साधने असतील. महाराष्ट्र आणि केरळमध्ये राजधानीच्या व्यतिरिक्त इतर प्रमुख शहरांमध्ये प्रात्याक्षिक करण्याचा प्रयत्न आहे.
कार्यालयात उशिरा येणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी नवी नियमावली. सातत्यानं उशिरा येणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. सरकारी कार्यालयात उशिरा येणाऱ्यांना चाप लावण्याचा प्रयत्न. राज्य सरकारचा अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय.
महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात खाजगी ट्रॅवल्स बस पलटली. असंख्य प्रवासी जखमी झाले असून घटनास्थळाकडे पोलिस रवाना. संपूर्ण घाटातील वाहतूक थांबली. 31 डिसेंबरसाठी महाबळेश्वरकडे चाललेले पर्यटक अडकले.
देशातील सर्व राज्यात 2 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचं ड्राय रन, केंद्रीय आरोग्य विभागाचा उच्चस्तरिय बैठकीत निर्णय
आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात
आज अनोखं न्यू ईअर सेलिब्रेशन केलं जाणार आहे.
देशभरात पार्टी, डान्स सुरु असतानाचा वरळीत गेली 28 वर्ष एक वेगळी परंपरा चालत आलेली आहे. वर्षभरात घडलेल्या वाईट घटनांची बिल्डिंगजवळ प्रतिकृती साकारली जाते आणि 31 डिसेंबरच्या रात्री या प्रतिकृतीचं दहन केलं जातं. यंदा कोरोना काळातला एक बॅड मॅन साकारला आहे आणि पुढच्या वर्षातल्या काही नियमावलीसाठी लोकांचे अभिप्राय मागवले आहेत.
एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण. वैद्यकिय सूत्रांच्या माहितीनुसार खडसे होम क्वारंटाईन. मुक्ताईनगरमधील घरी उपचार सुरु
हैदराबाद, महाराष्ट्र ,बिहारनंतर आता एमआयएम आता भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गुजरातेमध्ये निवडणूक लढवणार आहे. गुजरातमध्ये भारतीय ट्रायबल पार्टीसोबत युती करुन एमआयएम नगरपालिका निवडणुका लढवणार आहे. अहमद पटेल यांच्या निधनानंतर गुजरातमध्ये काँग्रेस पार तळाला गेली आहे. त्यामुळे तिथली मुस्लीम मतं आपल्या बाजूने घेण्याचा एमआयएमचा प्रयत्न असणार आहे. गुजरातमध्ये केवळ निवडणुका लढणार असं नाही तर जिंकणार म्हणजे जिंकणारच, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
रायगड : कशेडी घाटात भोगाव येथे चिंतामणी ट्रॅव्हल्स 50 फुट दरीत कोसळली, विरारहून कणकवलीला निघाली होती बस. यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. बाकीच्या प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पहाटे चार वाजता हा अपघात घडला
2020 या वर्षाला गुडबाय करुन 2021 या नववर्षाचे स्वागत काही तासांवर येऊन ठेपले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस अलर्ट झाले असून मद्यपान करणाऱ्यांवर वाहतूक विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 डिसेंबरपासून कारवाई सुरु केली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारुन प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी करताना पोलीस आणि नागरिक या दोघांची सुरक्षा लक्षात घेऊन खास बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांना पीपीई किट देण्यात आले आहेत. ते घालूनच नागरिकांची तपासणी होत आहे. दुसरीकडे ब्रेथ अॅनालायजर वापरताना प्रत्येक नागरिकांसाठी वेगळे नोझल वापरण्यात येत आहे.
औरंगाबाद शहरात चायनीज नायलॉन मांजा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद आयुक्तालयाच्या हद्दीत चायनीज नायलॉन मांजा विकता येणार नाही. पतंग विक्रेता हा मांजा विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे .औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेश. चायनीज नायलॉन मांज्यामुळे अपघात होण्याच्या शक्यतेने पाऊल उचलले आहे.
नागपुरात हत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोनच दिवसांपूर्वी शहरात गुन्हे 15 टक्के कमी झाल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर नागपूरच्या वाथोडा भागात गुन्हेगारांमध्ये आपापसात झालेल्या संघर्षात एकाची हत्या झाली आहे. आकीब अब्दुल सत्तर असे मृताचे नाव असून तो ऑटो चालक होता, मात्र त्याच्यावर काही गुन्ह्यांची नोंद होती. गेले काही दिवस आकीबचे परिसरातील इतर काही गुन्हेगारांसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरुन वाद सुरु होते. मंगळवारी दुपारी प्रकाश कोसरे नावाच्या गुन्हेगाराने त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांच्या मदतीने आकीबवर चाकू आणि लाकडी दंडुक्याने हल्ला चढवला. चौघांनी मिळून आकीबची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक केली असून पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे..
डॉ. शीतल आमटे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष. डॉ. शीतल यांचा मृत्यू प्राथमिक दृष्ट्या घातपात वाटत नसल्याची जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांची माहिती, अल्सर झालेल्या कुत्र्यांना संपविण्यासाठी डॉ. शीतल यांनी 3 प्रकारचे इंजेक्शन बोलावले आणि त्यातील एक रिकामे अँपुल मृतदेहाशेजारी मिळाल्याचा खुलासा, व्हिसेरा अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती.
डॉ. शीतल आमटे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष. डॉ. शीतल यांचा मृत्यू प्राथमिक दृष्ट्या घातपात वाटत नसल्याची जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांची माहिती, अल्सर झालेल्या कुत्र्यांना संपविण्यासाठी डॉ. शीतल यांनी 3 प्रकारचे इंजेक्शन बोलावले आणि त्यातील एक रिकामे अँपुल मृतदेहाशेजारी मिळाल्याचा खुलासा, व्हिसेरा अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती.
लहान बाळाने खेळताना रुपयांची नाणी, फळांच्या बिया, पिन खाल्ल्याचं आपण ऐकलं असेल. पण औरंगाबादेत एका 33 वर्षीय व्यक्तीने चक्क लांबलचक टूथब्रश गिळला. त्यामुळे पोटात वेदना होऊ लागल्याने त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या व्यक्तीने टूथब्रश गिळल्याचं सिटीस्कॅनमधून लक्षात आलं. त्याच्यावर घाटी रुग्णालयात तात्काळ शस्त्रक्रिया करुन पोटातून टूथब्रश बाहेर काढण्यात आला. सध्या या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे.
लहान बाळाने खेळताना रुपयांची नाणी, फळांच्या बिया, पिन खाल्ल्याचं आपण ऐकलं असेल. पण औरंगाबादेत एका 33 वर्षीय व्यक्तीने चक्क लांबलचक टूथब्रश गिळला. त्यामुळे पोटात वेदना होऊ लागल्याने त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या व्यक्तीने टूथब्रश गिळल्याचं सिटीस्कॅनमधून लक्षात आलं. त्याच्यावर घाटी रुग्णालयात तात्काळ शस्त्रक्रिया करुन पोटातून टूथब्रश बाहेर काढण्यात आला. सध्या या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम वन दुग्ध व पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पित्रृशोक झाला. त्यांचे वडील विठोबा रामा भरणे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून न्युमोनियाने त्रस्त असल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्यांच्यावर केइएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील मूळ गावी भरणेवाडी येथे सकाळी 11 वाजता होणार आहे.
नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का ; भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत, नवीन गवते , दिपा गवते आणि अपर्णा गवते यांचा शिवसेनेत प्रवेश, तिन्ही नगरसेवक गणेश नाईक यांचे खंदे समर्थक
जंजिरा किल्ल्यावरील पर्यटकांना केलेली प्रवेश बंदी मागे. एका दिवसात फक्त 400 पर्यटकांना प्रवेश. आवश्यक उपाययोजना करीत जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा आदेश.
प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांना कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी लक्षणे दिसू लागल्याने केली होती तपासणी, सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात शशिकांत यांच्यावर सुरू आहेत उपचार, शशिकांत यांची तब्येत व्यवस्थित असून, घरातील इतर कोणत्याही व्यक्तीला त्रास नाही
शिर्डीतील महिला मिसिंग प्रकरणात मोठा खुलासा. दिप्ती सोनी प्रियकरासोबत निघून गेल्याचं पोलीस तपासात उघड. तीन वर्षांपूर्वी शिर्डीतून बेपत्ता झाली होती इंदूरची दिप्ती सोनी. पती मनोज सोनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मानव तस्करी बाबत न्यायालयाने त्यावेळी चिंता व्यक्त केली होती. तब्बल साडेतीन वर्षांनी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येच मिळून आली दीप्ती. प्रियकर ओमप्रकाश चंदेल सोबत दिप्ती निघून गेल्याचं शिर्डी पोलिसांनी खुलासा केला. पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांची माहिती.
राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेले राज्य सरकार राज्य महिला आयोगावरील नियुक्त्या करण्याची तत्परताही दाखवित नाही. महिला आयोगाच्या सदस्यांना हटविताना महाआघाडी सरकार किमान सौजन्य दाखवीत नाही. महिलांच्या विषयात तरी या सरकारने सूडबुद्धीचे राजकारण खेळू नये, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, फडणवीस सरकारने नियुक्त केलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्यांना मार्च 2020 मध्ये पदावरून हटविण्यात आल्याचे पत्र या सदस्यांना नोव्हेंबरमध्ये पाठविण्यात आले. राज्य महिला आयोग हा अर्ध न्यायिक आयोग आहे. या आयोगावरील नियुक्त्या करण्याची विशिष्ट पद्धत आहे. या आयोगावर सदस्य म्हणून नियुक्त केलेल्यांना एकाएकी हटविता येत नाही. फडणवीस सरकारने नियुक्त केलेल्या 6 सदस्यांना महाआघाडी सरकारने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच हटविले. एवढे करूनही महिला आयोगाच्या संकेतस्थळावर अजूनही या सदस्यांची नावे, छायाचित्रे आढळून येत आहेत. या सदस्यांनी मार्च ते सप्टेम्बर 2020 या काळात मिळालेला भत्ता तातडीने आयोगाच्या बँक खात्यात भरावा, असेही या सदस्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे राज्यातील महिला, तरुणी बालिकांवरील अत्याचारांच्या घटनांत मोठी वाढ होत आहे. अशा स्थितीत महिला आयोगावरील नियुक्त्या तातडीने करण्याची गरज आहे. आशी मागणी भाजपच्या वतीनं केली.
गेवराई तालुक्यातील पाचेगावसह इतर दोन ग्रामपंचायतीने एका महिलेला गावातून हद्दपार करण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेतला होता. या ठरावाची आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून तपासणी सुरू झाली आहे..
गेवराई पंचायत समितीचे समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी हा ठराव तपासला. त्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला गावामध्ये ग्रामसभा झाल्याचेही कळवले आहे.. असा ठराव घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतला आहे का, तसेच याबरोबरच गावच्या ग्रामसेवकाने ठराव कसा घेतला याची सुद्धा आता तपासणी केली जाणार आहे.
अहमदनगर : ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी केला वाहतुकीत बदल. अहमदनगर-पुणे मार्गावर बेलवंडी फाट्याच्या पुढे वाहनांना बंदी, वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटस मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविणार. नगरहून जाणारी वाहने केडगाव बायपास पासूनच नगर-दौंड रोडने वळविण्यात येणार : पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आदेश
संजय राऊत आणि अनिल परब यांच्यात 'सामना' कार्यालयात दुपारी अर्धा तास चर्चा. वर्षा राऊत यांना आलेल्या ED समन्सबाबत कायदेशीर बाजूंवर चर्चा. वैयक्तिक कामासाठी राऊत यांना भेटल्याचा परब यांचा दावा.
संजय राऊत - अनिल परब यांच्यात 'सामना' कार्यालयात दुपारी अर्धा तास चर्चा.. वर्षा राऊत यांना आलेल्या ED समन्सबाबत कायदेशीर बाजूंवर चर्चा झाल्याची शक्यता.. तर वैयक्तिक कामासाठी संजय राऊत यांना भेटल्याचा अनिल परब यांच्याकडून स्पष्ट
अहमदनगर : रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेल्या पत्रकार बाळासाहेब बोठे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात बाळासाहेब बोठे आणि डॉ. भागवत दहिफळे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगल हजारे यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. मंगल हजारे या सरकारी दवाखान्यात कंत्राटी कामगार होत्या. बाळासाहेब बोठे यांनी नोकरी घालवण्याची भीती घालून मंगल हजारे यांच्याकडे 10 लाखांची खंडणी मागितली अशी तक्रार हजारे यांनी केली आहे. यावरून बाळासाहेब बोठे आणि डॉ.भागवत दहिफळे यांच्याविरोधात संगनमत करून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळासाहेब बोठे हे रेखा जरे हत्येप्रकरणी गेल्या 26 दिवसांपासून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बोठे यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातच आता आज एक खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने बाळासाहेब बोठे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यवतमाळ : पीकविमा कंपनी इफको टोकियोच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसनेच्या खासदार भावना गवळी, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, विधान सभा प्रमुख संतोष ढवळे, महेश पवार यांच्यासह नऊजणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, अंगावर जाणे आणि मारहाण करणं अशा गुन्ह्यांसाठी कलम 143, 352, 323, 506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना लॉकडाऊनमध्ये जवळपास सहा महिने बंद असलेली गुहागर धोपावे ते दाभोळ बोटीमधून होणारी प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. यामुळे दळणवळणाचा मार्ग सुकर झाला आहे. गुहागरच्या नागरिकांना अगदी पाच मिनिटांत दाभोळला जाण्याचा पर्यायी मार्ग खुला झाला आहे. त्याच बरोबर वर्षाअखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गुहागरला येणारे पर्यटक प्रवासी बोटीचा आनंद घेत आहेत.
ब्रिटनमधून मुंबईत आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे. याविषयी ते म्हणाले की,
25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर आणि 23 डिसेंबरपासून आतापर्यत जे प्रवासी युके, आखाती देशातून आले आहेत, त्या सगळ्यांना आम्ही क्वॉरन्टीन केलं होतं, त्यासोबतच त्यांच्या टेस्टिंगच्या प्रक्रिया सुद्धा सुरु आहे. या टेस्टिंगमध्ये 25 ते 21 डिसेंबर दरम्यान आलेले 2600 पेक्षा जास्त प्रवासी आहे. 21 डिसेंबर ते आतापर्यत आलेले सर्व प्रवाशांचे टेस्टिंग केले आहेत.
या दरम्यान 12 प्रवासी पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे.
यामध्ये पाच कोरोनाबाधित मुंबईतील आहेत. तर उर्वरित सात जण इतरत्र भागातील आहेत. या सर्वांचे नमुने एनआयव्ही पुणे इथे पाठवले असून त्यांचा अहवाल येत्या एक दोन दिवसात येईल. त्यानंतर पॉझिटिव्ह आढळलेले 12 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे की नाही. दरम्यान या 12 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन जण आज निगेटिव्ह झाले आहेत. काळजी करण्याचं कारण नसलं तरी खबरदारी घ्यावी लागणार आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेतला जात असून त्यांचीही चाचणी सुरु आहे. नव्या कोरोना विषाणूबाबत संभाव्य खबरदारी आपण घेत आहोत. त्यामुळे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे
बुलढाणा : जिल्हयातील सोनाळा येथील शेतकरी विजय रमेश वेरुळकर यांच्या पाच एकर शेतातील संत्र्याची ९०० झाडे कापून फेकली गेली आहेत. एक वर्षापूर्वी लावलेली पाच एकरातील चार ते पाच फूट उंच असेलली ९०० झाडे बुडासकट कापून फेकण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार करुनही पोलिस प्रशासन दखल घेत नसल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आज शेतकरी नेत्यांनी या शेतकरयांची भेट घेऊन शेतातील कपलेल्या झाडांची पाहणी केली. मात्र पोलिसांनी अजूनही या झाडे कापणाऱ्या गुन्हेगाराचा शोध लावलेला नाही.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला गुजरात राज्यात तस्करी केला जाणारा 66 लाखाचा मद्यसाठा जप्त, राज्य उत्पन्न शुल्क विभागाची कारवाई
मराठा क्रांती ठोक मोर्चा तसेच छावा संघटनेचे प्रतिनिधी मंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहे. मराठा आरक्षण तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी या प्रतिनिधी मंडळाची आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चा तसेच छावा संघटनेचे प्रतिनिधी मंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहे. मराठा आरक्षण तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी या प्रतिनिधी मंडळाची आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल पडवे गावातील नारायण राणेचं महत्वाकांक्षी लाइफ टाईम हॉस्पिटल मधील मेडिकल कॉलेजच उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 30 जानेवारीला लाइफ टाईम हॉस्पिटल मधील मेडिकल कॉलेज सुरू होणार असून यावर्षी पासून मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. चिपी विमानतळावर अमित शहा यांच्या विमानाचे लँडिंग होणार आहे. तिथून हेलिकॉप्टरने चिपी ते पडवे मेडिकल कॉलेज पर्यंत अमित शहा येतील अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.
ब्रिटनहून भारतात आलेल्या सहाजणांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण. भारतातील कोरोनाचा नवा प्रकार धडकला.
सिंधुदुर्ग : मालवण मधील आंगणेवाडीची श्री देवी भराडीची यात्रा 6 मार्च 2021ला होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची यात्रा केवळ आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात पार पडणार आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली.
दत्त जयंती निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्यात फुलांनी दत्तांची मूर्ती ही साकारण्यात आली आहे. पुण्यातील देवाच्या आळंदीत यानिमित्ताने उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
बुलढाणा ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 1136 अर्ज दाखल झाले आहे. सर्वाधिक नांदुरा तालुक्यातुन 204 अर्ज दाखल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 527 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होतेय.
अक्कलकोट शहरात भाविकांना मनाई. कोरोनामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढून मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात भाविकांच्या प्रवेशाला मनाई करण्यात आली आहे.
सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटी 5 लाखांची बोली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बोली लावल्याचा प्रकार देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीत घडला. याचसंदर्भात ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त गावकऱ्यांची सभाही झाली .
रायगड : 31 डिसेंम्बरच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात अकरा वाजल्यापासून संचारबंदी लागू, रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक तयार करणार
रायगड : 31 डिसेंम्बरच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात अकरा वाजल्यापासून संचारबंदी लागू, रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक तयार करणार
अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान नवीन स्टेशन उभारण्यास रेल्वे बोर्डाची मान्यता, चिखलोली नावाचे नवीन स्टेशन उभारले जाणार, या नवीन स्टेशन मुळे दोन्ही स्थानकांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास होईल मदत, या स्टेशनचे बांधकाम एमआरव्हीसी मार्फत करण्यात येईल
अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान नवीन स्टेशन उभारण्यास रेल्वे बोर्डाची मान्यता, चिखलोली नावाचे नवीन स्टेशन उभारले जाणार, या नवीन स्टेशन मुळे दोन्ही स्थानकांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास होईल मदत, या स्टेशनचे बांधकाम एमआरव्हीसी मार्फत करण्यात येईल
नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे गावात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटी 5 लाखांची बोली लागली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ही बोली लावण्यात आली. ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त गावकऱ्यांची सभा झाली. यावेळी रामेश्वर महाराज मंदिरच्या बांधकामासाठी लावण्यात परस्पर विरोधी पॅनलमध्ये लिलाव रंगला. त्यात सुनील देवरे यांची बोली अंतिम ठरली. आता माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
यवतमाळ : महागाव तालुक्यातील मुडाणा येथील एका शेतकऱ्याच्या घर आणि गोठ्याला रात्री आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी भिमराव पाईकराव आपल्या घरात असतानाच अचानकपणे आग लागली. ताबडतोब घरातील सर्व मंडळी घराबाहेर आली, तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत घरातील अन्नधान्य, गोठ्यातील कोंबड्या ,बकऱ्या यांचाही कोळसा झाला आहे. शेळ्याचे 7 पिल्ले तसेच 50 कोंबड्या आणि घरातील रोख रक्कम 35 हजार रूपये आगीत भस्मसात झाली आहे. ही आग गावकाऱ्यांच्या मदतीने विझविण्यात आली. मात्र ही आग नेमकी कशाने लागली हे कळू शकलेले नाही.
यवतमाळ : महागाव तालुक्यातील मुडाणा येथील एका शेतकऱ्याच्या घर आणि गोठ्याला रात्री आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी भिमराव पाईकराव आपल्या घरात असतानाच अचानकपणे आग लागली. ताबडतोब घरातील सर्व मंडळी घराबाहेर आली, तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत घरातील अन्नधान्य, गोठ्यातील कोंबड्या ,बकऱ्या यांचाही कोळसा झाला आहे. शेळ्याचे 7 पिल्ले तसेच 50 कोंबड्या आणि घरातील रोख रक्कम 35 हजार रूपये आगीत भस्मसात झाली आहे. ही आग गावकाऱ्यांच्या मदतीने विझविण्यात आली. मात्र ही आग नेमकी कशाने लागली हे कळू शकलेले नाही.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहमीच आपल्या कवितांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांनी कवितेतून राज्य सरकारची खिल्ली उडवली आहे. राज्यातील महाविकास आघाडीवर कवितेतून टीका केली आहे. रामदास आठवले यांची कविता - जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरे सरकार पडेल थंड;
लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी आणि जाणार आहे महाविकास आघाडी
बीडच्या गेवराई तालुक्यातील पाचेगाव या गावामध्ये धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याच गावातील एक बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीने तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव घेतला आहे. विशेष म्हणजे याच महिलेच्या विरोधात गावकरी बीडच्या एसपी ऑफिससमोर जमा झाले होते. यावेळी ही पीडित महिला सुद्धा उपस्थित होती. जमलेल्या गर्दीतून पोलिसांनी तिला कसंबसं बाहेर काढले. मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये काही काळ तणाव पाहायला मिळाला.
'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे नाव देण्याची मागणी नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन केली आहे.'
रायगड : ३१ डिसेंबरच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.. ३१ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून संचारबंदी लागू असेल. रायगड जिल्ह्यात हॉटेल्स आणि कॉटेजेसमधील सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक तयार केली जाणार आहेत.
प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाईनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना मुंबई क्राइम ब्रँचने अटक केली ..
तथापि, ज्या प्रकरणात हे अटक करण्यात आली आहे, पोलिस हे सांगण्यास नकार देत आहेत ... उद्या मुंबई गुन्हे शाखा यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊ शकते.
यवतमाळ : पीकविमा कंपनीच्या मॅनेजरच्या अंगावर सोयाबीन टाकून शिवसैनिकांकडून मारहाण
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अशा आपत्ती काळात शेतकऱ्यांना थोडी मदत व्हावी म्हणून शेतकरी पीक विमा भरतात. यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्यानंतर केवळ 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई मिळाली. जिल्ह्यातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेपासून वंचित राहिले. खरं तर विमा कंपनीला यात 158 कोटी शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियममधून रुपये मिळाले, मात्र विमा कंपनीने लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवलं असा आरोप करत खासदार भावना गवळी यांनी विमा कंपनी विरोधात आज जबाब दो आंदोलन पुकारलं. शेतकऱ्यांना विमा भरपाईपासून वंचित ठेवणे हा अन्याय आहे, असे शिवसेना खासदार भावना गवळी यानी म्हटलं आहे. त्याचाच जबाब विचारण्यासाठी शिवसैनिक विमा कंपनी इफको टोकियो कंपनीच्या कार्यालयात गेले, तिथं कुठलंच ठोस उत्तर न मिळाल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि खासदार भावना गवळी यांच्या सामोरच विमा कंपनीच्या मॅनेजर सचिन सोरोशे यांच्या अंगावर सोयाबीन टाकून त्यांना मारहाण केली.
महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटकांसाठी 31 डिसेंबरला रात्री संचारबंदी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, रात्री 10 नंतर 144 कलम लागू, 31 डिसेंबरचे रात्रीचे सर्व कार्यक्रम करावे लागणार
विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूरच्या पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी, काँग्रेस पक्षाचे चंद्रपुरात राज्य सरकार विरोधात धरणे, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सरकारला दिला घरचा आहेर.. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सामील आहे की नाही असा आज पुन्हा एकदा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आणि याला कारण ठरलं आहे चंद्रपूर शहरात आज काँग्रेसकडून करण्यात आलेलं एक निषेध आंदोलन आणि ते ही आपल्याच राज्यसरकार विरोधात. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यातर्फे प्रियदर्शनी चौकात दिवसभराचा धरणे कार्यक्रम ठेवण्यात आला. कोरोना काळात लोकांना मदत करण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, जिल्ह्यातील बिगडलेली कायदा-सुव्यवस्था, दारू तस्करी या सारख्या मुद्द्यांवर हे निषेध आंदोलन ठेवण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या आंदोलनाच्या निमित्ताने पुगलिया यांनी आपल्याच पक्षाचे मंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूरच्या पालकमंत्री पदावरून हटवण्याची देखील मागणी केली आहे.
भाजपला रोखण्याऱ्या नेत्यांना त्रास देण्यासाठी कागदाचे तुकडे पाठवले जातात : संजय राऊत
भाजपची माकडं कालपासून उड्या मारत आहेत : संजय राऊत
ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही; राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर : संजय राऊत
ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही; राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर : संजय राऊत
मुंबई : साकीनाका येथील 90 फूट रस्त्यावर गोदामांना भीषण आग लागली आहे. ही गोदामे टिश्यू पेपरची असल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र तीन गोदामे आणि एक घर जळून खाक झालं आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेलं नाही.
यवतमाळ : लाखो शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा प्रीमियम भरला मात्र अत्यंत कमी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संसदेत आणि कोर्टात जाण्याच्या तयारीने शिवसेना मैदानात उतरली आहे असं यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या सोबतीने विमा कंपनीच्या विरोधात शिवसेनेने "जवाब दो" आंदोलनाची हाक दिलीय.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीकविमा हफ्ता भरल्यानंतर केवळ 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कंपनीकडून मिळाली. लाखो शेतकरी प्रधानमंत्री पीकविम्यापासून वंचित राहिलेले आहेत. शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हफ्त्यातून विमा कंपनीला 158 कोटी रुपये मिळाले, मात्र विमा कंपनीने लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवलं आहे. हा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आहे असं शिवसेना खासदार भावना गवळी यांनी म्हटलं आहे. आता वंचित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी घेऊन शिवसेनेचं 'जबाब दो आंदोलन' होत आहे.
यवतमाळ : शिवसेनेच्या दोन मोठया नेत्यांमध्ये दुफळी उघड झाली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यात पीकविमा कंपनी विरुद्ध पुकारलेल्या मोठ्या मोर्चाच्या निमित्ताने दोन शिवसेना नेत्यांमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. यवतमाळ मध्ये आज पीक विमा कंपनी विरुद्ध आंदोलन होत असून त्यासाठी रात्रीतून शहरभर बॅनर लावण्यात आली, मात्र या बॅनरवर वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा फोटो नाही. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड या आंदोलन मोर्चात सहभागी होणार नाही अशी शक्यता वर्तवली जातेय. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खासदार भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील दुफळी मिटवली होती. आता पीक विमा कंपनीच्या आज होणाऱ्या आंदोलनाच्या निमित्ताने दोन मोठ्या नेत्यांमध्ये दुफळी कायम असल्याचं स्पष्ट झालंय.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दर्शनासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात दाखल, अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर फडणवीस गोव्याला रवाना होणार
रायगडमध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेसवे खाजगी बसचा अपघात, दोन जण गंभीर तर 6 जण किरकोळ जखमी, पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ अपघात, बसची ट्रकला पाठीमागून धडक, बसचालक व अन्य एक प्रवासी गंभीर जखमी
कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसची प्रदूषण नियंत्रण पथकाकडून अचानक तपासणी, पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई, या तपासणीमुळे प्रोसेसिंग उद्योजकांमध्ये खळबळ, प्रदूषणामुळे पंचगंगा नदीमधील मासे मृत
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक, एक जानेवारीला कोरेगाव भीमा या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार, दुपारी 12 वाजता पुण्यातील नवीन सर्किट हाऊसमध्ये या बैठकीचं आयोजन, त्यानंतर शंभूराज देसाई माध्यमांशी बोलणार
ईडीची नोटीस आल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत, मात्र अजून ईडीची नोटीस आलेली नाही, हे सगळं राजकरण आहे, ज्यांना राजकरण करायचं आहे त्यांना करु द्या, मी भाजप ऑफिसमध्ये नोटीस शोधायला माझा माणूस पाठवला आहे, जे काही बोलायचे आहे ते दोन वाजता बोलणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार, भाविकांची गर्दी वाढत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा महत्त्वाचा निर्णय, नवीन वर्षात मंदिराचे चारही दरवाजे खुले केले जाणार, अध्यक्ष महेश जाधव यांची एबीपी माझाला माहिती
भिवंडी तालुक्यातील वाशेरे येथील रीनायन कंपनीत काम करणारे नऊ कामगाराना विजेचा जोरदार धक्का लागून जबर जखमी झाले आहेत. सर्व नऊ जखमी कामगारांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे . या अपघाताबाबतची माहिती आज उघडकीस आली आहे .
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Coronavirus | कोरोनाचे बदलते प्रकार लसीचा प्रभाव कमी करणार नाहीत : आरोग्य मंत्रालय
पहिल्या कोरोना व्हायरसचं संकट टळत नाही तोच जगातील काही राष्ट्रांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. मुख्य म्हणजे याचा संसर्ग पसरण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वत्र सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. असं असतानाच पहिल्या प्रकारच्या कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून विकसित करण्यात आलेली लस ही दुसऱ्या व्हॅरिएंटच्या बाबतीत कमी प्रभावी किंवा अकार्यक्षम असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली. सध्याच्या लसी या नव्या प्रकारापासून रुग्णांचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा कोणताही पुरावा युके, दक्षिण आफ्रिका अशा राष्ट्रांकडून देण्यात आलेला नाही, असं प्रिन्सिपल साइंटीफिक के. विजय राघवन यांनी सांगितलं.
ब्रिटन, अमेरिका आणि युरोपसारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळा : राजेश टोपे
ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या या विषाणूच्या भारतातील प्रवेशामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रात कुठेही नवीन विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारत-इंग्लंड दरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही रद्द, नागरी उड्डाण मंत्रालयाचे संकेत
ब्रिटनहून भारतात परत आलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (स्ट्रेन) आढळला आहे. दरम्यान, विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबत सांगितलं की, भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती थोडीशी वाढवावी लागेल. पुढील एक-दोन दिवसात आम्हाला अतिरिक्त पावले उचलण्याची गरज आहे की नाही किंवा तात्पुरती निलंबन शिथिल करण्यास सुरवात केव्हा होईल हे आम्हाला कळेल. नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) लक्षात घेता 23 ते 31 डिसेंबर दरम्यान इंग्लंड ते भारत उड्डाणे रद्द केली होती. आता 31 डिसेंबरनंतरही उड्डाणे रद्द केली जाऊ शकतात, असं हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं. ब्रिटनमध्ये आढळणारा हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरतो आणि तो अतिसंसर्गजन्य आहे.
ठाण्यात ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी सहप्रवाशांवरही कारवाई होणार!
2020 या वर्षाला गुड बाय करुन 2021 या नववर्षाचे स्वागत काही तासांवर येऊन ठेपले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस अलर्ट झाले असून मद्यपान करणाऱ्यांवर वाहतूक विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 डिसेंबरपासून कारवाई सुरु केली आहे. पहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये सुमारे 415 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारुन प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.