मुंबईसह राज्यात अंड्यांच्या किंमतीत वाढ
एबीपी माझा वेब टीम | 17 Nov 2017 11:24 AM (IST)
आज (शुक्रवार) मार्केटमध्ये लेअर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे.
मुंबई : हिवाळा आला कि लोकांचा कल आरोग्यवर्धक असलेल्या अंड्याकडे आपोआप वळतो. पण यावेळीच्या हिवाळ्यात भाज्यांप्रमाणे अंड्याचे भाव ही गगनाला भिडलेले आहेत. आज (शुक्रवार) मार्केटमध्ये लेअर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे. तर देशी अंड्यांचे भाव 120 रुपये डझन झाले आहेत. म्हणजेच एका देशी अंड्याची किंमत जवळपास 11 रुपये इतकी झाली आहे. तापमानाच्या घसरत्या पाऱ्यामुळे अंड्यांचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.