मुंबई: जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर मंदिरांच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटांचा दान केल्या जात आहेत. त्यामुळे आयकर विभागानं मंदिरांकडे जुन्या नोटांचा तपशील मागवला आहे.
पंढरपूर आणि शिर्डी संस्थानला यासंदर्भात आयकर विभागानं नोटीस दिली आहे. ज्यामध्ये 9 नोव्हेंबरपासून जमा झालेल्या जुन्या नोटांचा हिशेब मागितला आहे.
गेल्या आठ दिवसात शिर्डीच्या साई संस्थानमध्ये 40 लाख रुपयांच्या जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा जमा झाल्या आहेत. पंढरपूरमध्येही मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा आल्या आहेत.