Panvel ITI Hostel : फुटलेल्या खिडक्या, तुटलेले बाकडे...वसतिगृहाची अवस्था भूतबंगल्यासारखी

पनवेलमधील आयटीआय कॉलेजची अवस्था एखाद्या भूतबंगल्यासारखी झालीय. विशेष म्हणजे २०१४ साली ही इमारत धोकादायक ठरवूनही त्याच ठिकाणी वर्ग भरवले जातायत. म्हणजेच जवळपास ८ वर्ष हजारो विद्यार्थ्यांनी जीवमुठीत घेऊन शिक्षण घेतलंय. वर्गखोल्यात तुटलेल्या खिडक्या, वाकलेले फॅन्स, तुटके बॅन्च अशात कित्येक विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय. याच आयटीआय कॉलेज आणि हॉस्टेलपासून १०० मीटर अंतरावर जिथे भविष्यातले शिक्षक घडवले जातायत. त्या बीएड कॉलेजच्या हॉस्टेलचीही स्थिती अशीच आहे. आणि अशाच परिस्थिती इथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतायत. जीव मूठीत घेऊन राहतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola