मुंबई : गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. 11 फेब्रुवारी 2020 रोजी योजनेच्या अंमलबजावणीला 17 दिवस पुर्ण झाले. या 17 दिवसांच्या काळात राज्यात तब्बल 2 लाख 33 हजार 738 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याचे दिसून आले आहे.


प्रजासत्तादिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे 2 फेब्रुवारी 2020 पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक (1 लाख 5 हजार 887) झाली होती. आता 11 फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.

शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. दर दिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची 11,300 थाळींची संख्या आता 14,639 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात या योजनेअंतर्गत 139 शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

Special Report | पुण्यात शिवभोजनला उदंड प्रतिसाद, मार्केट यार्डातील केंद्रावर लांबच लांब रांगा | ABP Majha


 

लाभार्थ्यांना फक्त 10 रुपयात थाळी

शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या भोजनालयात प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येते. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत असतात. ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येते. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान आहे.

संबंधित बातम्या :

शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, प्रजासत्ताक दिनी शुभारंभ!

शिवसेनेत हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा एकटी लढवावी, चंद्रकांत पाटलांचे आव्हान