Heavy rain alert : गणपती विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) जिल्हा आणि नागरी प्रशासनाला सतर्क केले आहे. हवामान विभागाने नागरिकांनाही विसर्जनाच्या दिवशी योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 


पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 सप्टेंबरच्या सुमारास पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर त्याच्या प्रभावाखाली कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या ४८ तासांमध्ये या दोन्ही कारणांमुळे महाराष्ट्रात 7 सप्टेंबरपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या चारही उपविभागांमध्ये सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 ते 10 सप्टेंबर या कालावधीत पाऊस होण्याची शक्यता आहे. 


IMD ने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत गडगडाटी पाऊस तसेच 30 ते 40 ताशी वेगाने वादळी वारे वाहतील. पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह राज्यातील घाटमाथ्यांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, परभणी यासह इतर अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 


कश्यपी पुढे म्हणाले की, कमी दाब प्रणालीची हालचाल पश्चिम वायव्य दिशेला असल्याने दक्षिणेकडे झुकलेली असेल. म्हणून, त्याचा परिणाम मुख्यतः राज्याच्या उत्तर-मध्य आणि अगदी दक्षिण भागांवर होईल. म्हणून, आम्ही कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये 9 सप्टेंबर रोजी अलर्ट जारी केला आहे. कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या जवळ जात असल्याने अरबी समुद्रातून वाहणारे पश्चिमेचे वारेही अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. यामुळे 8-11 सप्टेंबर या कालावधीत सह्याद्री पर्वतरांगांवर होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या