नाशिक: जिल्ह्याच्या इगतपुरी येथील भावली धरणात (Dam) बुडून 5 जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन तरुण व तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते, त्यावेळी, रिक्षा धरणाजवळ उभी करुनते पाण्यात पोहोण्यासाठी गेले असता ही भीषण दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वी स्थानिक आदिवासींनी घरणाकडे धाव घेतली होती. 


धावली धरणात बुडालेले सर्वजण नाशिक रोड परिसरातील रहिवाशी आहेत. रिक्षा बाजुला लावून पोहोण्यासाठी धरणात उतरले असता सर्वजण बुडाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून ते धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी, धरणात उतरल्यामुळे एकापाठोपाठ एक सर्वच पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती मिळताच सर्वप्रथम स्थानिक आदिवासी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आदिवासी बांधवांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 


उजनी धरणात बोट उलटली, 4 बेपत्ता


सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातही अशीच एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. उजनी धरणात बोट (लोंज) उलटून चार जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने ही बोट उलटली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील मार्गावर वाहतूक करणारी ही लोंज (बोट) आहे.  या बोटीतील एकजण पोहोत बाहेर आल्याने ही घटना समोर आली असून बोटीसह इतरांचा शोध घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.


हेही वाचा


Nashik : 'तू बाहेर ये, तुझ्या दोन थोबाडीत देतो', मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल