Rohit Raut-Juilee Joglekar : मराठीमधील सुरेल जोडपं म्हणजे गायिका जुईली जोगळेकर (Juilee Joglekar ) आणि रोहित राऊत (Rohit Raut). या जोडप्याने 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. त्याआधी हे दोघेही जवळपास 3 वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अनेकदा या दोघांनीही त्यांच्या या निर्णयावर भाष्य केलं आहे. पण हा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला त्यानंतर अनेकदा त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं. त्यावर आता या दोघांनीही भाष्य करत सडेतोड उत्तर दिलं आहे. 


जुईली आणि रोहित या दोघांनीही नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधील नात्यावर भाष्य केलं. हल्ली अनेक जण पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी आधीच लिव्ह-इनमध्ये राहण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे घटस्फोट, ब्रेकअप यांसारख्या गोष्टींचा फारसा सामना करावा लागत नाही. असाच विचार जुईली आणि रोहित यांनी करत लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 


ट्रोलर्सना जुईली-रोहितचं उत्तर


आम्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही एकत्र गात असल्याचा एक व्हिडिओ टाकला. त्यावर आमच्या दोघांनाही खूप ट्रोल करण्यात आलं होतं. अरे हे दोघे एकत्र काय करतायत, तुम्ही एकत्र राहताय हे तुमच्या आईवडिलांना माहितेय का? अशा कमेंट्स आल्या होत्या. मला अशा लोकांना खरंच सांगायला आवडेल की, काय गरज आहे तुम्हाला, काय करायचं तुम्हा प्रत्येकाच्या बाबतीत. आमचे काही निर्णय असतात, आवडी असतात, त्यावर दुसऱ्या कोणी का बोट ठेवावं. अर्थात तुम्ही त्या गोष्टीविषयी गंभीर असता, तेव्हा खरंच लिव्ह-इन रिलेशनशिपचा फायदा होतो. आपल्याकडे अजूनही लोकांना लिव्ह-इन रिलेशनशिप हे हलकं टॅबूच वाटतं. म्हणजे आम्हाला तर तुम्हाला लाजाच नाहीत का? वैगरे म्हटलं होतं, असा अनुभव जुईली आणि रोहित या दोघांनी सांगितला. 


रोहित आणि जुईलीने बांधली लग्नगाठ


रोहित आणि जुईली हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन त्यांनी प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती. त्यानंतर त्यांनी 23 जानेवारी 2022 रोजी पुण्याच्या ढेपेवाढ्यात लग्नगाठ बांधली. 






ही बातमी वाचा : 


Kshitij Patwardhan : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या दोन घटनांवर मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट, म्हणाला, 'आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट...'