Aurangabad Accident News: औरंगाबादच्या (Aurangabad) मिटमिठा पडेगाव परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात (Accident) एकाचा मृत्यू (Death) झाला असून, दोनजण जखमी झाले आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या काकाला भेटून परत येणाऱ्या पुतण्याचा दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. ज्यात पुतण्याचा मृत्यू झाला आहे. विष्णू त्रिंबक वाघ (रा. मकरणपूर, ता. कन्नड) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांची पत्नी लता वाघ आणि आठ महिन्याच्या चिमुकली या अपघातात जखमी झाली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत त्रिंबक वाघ यांचे चुलते दत्तात्रय वाघ आजारी असल्याने नुकतेच त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या काकांना भेटण्यासाठी त्रिंबक वाघ काल सकाळी कन्नड येथून आपली दुचाकी घेऊन (MH.20.EH.0816) आपल्या काकांना भेटण्यासाठी औरंगाबादला आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लता वाघ आणि आठवर्षांची मुलगी देखील सोबत होती. काकांना भेटल्यावर ते पुन्हा आपल्या घरी परत निघाले होते. 


कारची जोरदार धडक...


दरम्यान आजारी काकांना भेटल्यावर आपल्या दुचाकीवरून वाघ हे पुन्हा कन्नडच्या दिशेने निघाले होते. मात्र औरंगाबाद शहराच्या बाहेर पडताच मिटमिटा पडेगाव रस्त्यावर दौलताबादच्या दिशेने जाणाऱ्या एका सुसाट कारने (MH.20.BY.2797) ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. कारचा वेग अधिक असल्याने धडक लागताच वाघ यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगी दुचाकीवरून दूरवर फेकले गेले. तर या भीषण अपघातात तिघेही गंभीररित्या जखमी झाले होते. 


डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले


वाघ यांच्या दुचाकीला अपघात झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी धाव घेत तातडीने तिन्ही जखमींना औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णाल्यात (Aurangabad Government Hospital) दाखल केले. मात्र डॉक्टरांनी (Doctor) तपासून वाघ यांचा मृत झाल्याचं घोषित केले. तर त्यांच्या पत्नीवर अतिदक्षता विभागाता उपचार सुरु असून, आठ महिन्याच्या मुलीला  किरकोळ मार लागला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


पोलिसांत गुन्हा दाखल...


औरंगाबादच्या पडेगाव येथे अपघात झाली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपस्थित नागरिकांच्या मदतीने तिन्ही जखमींना औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करित आहेत. 


Aurangabad News: औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात चोरांचा सुळसुळाट; रुग्णांच्या नातेवाईकांसह डॉक्टर हैराण