मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काळा पैसेवाल्यांची धावाधाव सुरु आहे. 500 आणि हजार रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत.


अडीच लाखाची रक्कम बँकेत जमा केल्यानंतर त्याबाबतची कोणतीही चौकशी होणार नाही. मात्र त्यावरील रकमेची चौकशी करु, असं मोदींनी सांगितलं आहे. त्यामुळे मोठी रक्कम जवळ असलेले लोक इतरांच्या खात्यावर जमा करत आहेत.

मात्र याचा फटका दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना म्हणजेच बीपीएल कार्डधारकांना बसू शकतो. बीपीएलधारकांनी त्यांच्या खात्यात 39 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास, त्यांचं कार्ड रद्द होऊ शकतं.

कारण ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 हजारांच्या आत आहे, त्यांनाच या कार्डाचा लाभ मिळतो. यामध्ये सलग तीन वर्ष जर तुमचं उत्पन्न 12 हजारपेक्षा जास्त म्हणजे 36 हजारपेक्षा जास्त असेल, तर तुमचं नाव दारिद्र्य रेषेतून आपोआप रद्द होईल.

त्यामुळे बीपीएल धारकाच्या खात्यात जर 39 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास, त्याचा फटका आपोआप कार्डधारकाला बसण्याची शक्यता आहे.