मुंबई: अपंग असल्याचा बनावट दाखला देऊन कलेक्टर झालेल्या पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्याबद्दलचा सविस्तर अहवाल द्या असे निर्देश मसुरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन अर्थात LBSNAA सेंटरने मागितले आहेत. आपल्या चमकोगिरीने वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस (Fake Certificates) तसेच खोटे ओबीसी सर्टिफिकेट सादर करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं समोर आलं आहे.


पुणे येथे ट्रनी आयएएस अधिकारी म्हणून काम करताना पूजा खेडकरांनी बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका आहे. अधिकारी म्हणून वावरताना त्यांनी खासगी ऑडी गाडीला अंबर दिवा लावला, तसेच निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. 


पूजा आणि तिचे वडील कारवाईस पात्र, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल 


पूजा खेडकरांबद्दल पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. ट्रेनी अधिकारी म्हणून पूजा खेडकरांनी केलेल्या मागण्या या अनाठायी असल्याचं दिसून आलं. पूजा खेडकर यांची एकूण वर्तणूक ही प्रशासकीय अधिकाऱ्यास शोभेल अशी नाही हे त्यांनी पाठविलेले मेसेजेस आणि त्यांच्या वर्तणुकीवरुन दिसून येते. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी हव्या असलेल्या सोईसुविधा याबद्दल आग्रह अनाठायी आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांच्या वडिलांची, दिलीप खेडकरांची वर्तणूकही आक्षेपार्ह असून कारवाईस पात्र आहे.


कोण आहेत डॉ. पुजा खेडकर? (Who Is Pooja Khedkar IAS)


पुजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. 


पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.


आता पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रं दाखवून IAS मिळवलं हे जर सिद्ध झालं तर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.


ही बातमी वाचा: