ठाकरेंचा चार्ज ठाकरेंकडे? भाजपनं रश्मी ठाकरेंना वादात का ओढलं? चंद्रकांतदादा भडकले, महापौर तडकल्या!
abp majha web team | 22 Dec 2021 10:23 PM (IST)
Aditya Thackeray on Next CM : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नाहीत. तर आज हिवाळी आधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या उपस्थितीवरून विरोधकांकडून सतत आरोप केले जात आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील यांनी काल मुख्यमंत्री बदलावरून वक्तव्य केले होते. "मुख्यमंत्र्याची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्यावा. त्यांचा इतर कोणावर विश्वास नसेल तर पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे चार्ज द्यावा" अशी टीका पाटील यांनी केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या टिकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर देले आहे.