मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषदा घेऊन शिवसेनेची भूमिका परखडपणे मांडणारे फायरब्रँड नेते संजय राऊत सध्या रुग्णालयात दाखल आहेत. अशाही परिस्थितीत त्यांनी आपली भूमिका मांडण्याचं काही सोडलेलं दिसत नाही. हरिवंशराय बच्चन यांना क्रेडीट देऊन कविता पोस्ट करुन "हम होंगे कामयाब, जरूर होंगे, असे ट्विट त्यांनी सकाळी केले आहे.

सत्तास्थापनेच्या या खेळात शिवसेनेचे बिनीचे शिलेदार खासदार संजय राऊत यांच्यावर काल (10 नोव्हेंबर) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राऊत यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये 2 ब्लॉक होते. राऊत यांच्यावर डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. राऊत यांच्या रक्तवाहिनीमध्ये तीन स्टेन टाकण्यात आले आहेत, असे त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी सांगितले आहे. 4 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळणार असून पुढील 3 दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे.

संजय राऊत रुग्णालयात असल्यामुळं ते आता शिवसेनेची भूमिका मांडणार नाहीत. असे वाटत असतानाच त्यांनी सकाळी ट्विट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।' बच्चन. हम होंगे कामयाब..जरूर होंगे.., असे ट्विट राऊत यांनी केले आहे. दरम्यान, पोस्ट केलेली कविता हरिवंशराय बच्चन यांची नसून सोहनलाल द्विवेदी यांची आहे.


गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. गेल्या 20 दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

अनेकांना असे वाटते की हरिवंशराय बच्चन यांची ही रचना आहे, मात्र, स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे ही रचना सोहनलाल द्विवेदी यांची असल्याचे सांगितले आहे.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

अभिनेता अमिताभ बच्चन यांची फेसबुक पोस्ट : -



संबंधित बातम्या :

संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी, लिलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

"अन्यथा शिवसेनेचा गेम भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून केला हे सिद्ध होईल"

सत्तास्थापनेसाठी भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांकडून निमंत्रण

सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी मुदतवाढीला राज्यपालांचा नकार, वेळ नाकारली दावा कायम : आदित्य ठाकरे