अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. गेल्या 20 दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.
संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपावर निशाणा साधला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते दररोज पत्रकार परिषद घेत होते. तसेच पक्षाची भूमिकाही घडणाऱ्या घडामोडींनंतर माध्यमांसमोर मांडत होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील संजय राऊत यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे.