देश लॉकडाउन असताना साखर कारखाने सुरुच; हजारो ऊसतोड कामगार फडात

संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, तरीही साखर कारखाने चालू असल्याने ऊसतोड कामगार कामावरच अडकले आहेत.

Continues below advertisement
बीड : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील सर्व उद्योग ठप्प झाले. खासगी कंपन्यांच्या कामगारांना देखील सुट्टी देण्यात आली. ज्यांना शक्य आहे, त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, आज ही राज्यातील अनेक साखर कारखाने चालू आहेत. याचा परिणाम म्हणून या कामावर असलेले ऊसतोड कामगार आजही उसाच्या फडामध्ये काम करत आहेत. बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी गेलेले लाखो कामगार अद्यापही फडावर काम करत आहेत. कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने अद्याप सुरु असल्याने या कामगारांना कारखान्यांनी काम सोडून जाण्यास मज्जाव केला आहे. कामगारांच्या मुकादम, टोळी प्रमुखांना काम सोडल्यास कमीशन, अग्रीम रक्कम न देण्याची धमकीच पत्रातून काही कारखान्यांनी दिली आहे. ऊसतोड कामगारही माणसेच आहेत गुलाम नाहीत. त्यांनाही कोरोना होऊ शकतो. संपूर्ण देश लॉक डाउन असताना साखर कारखाने चालू राहतातच कशी? सरकारने कारखाने बंद करून या कामगारांना स्वगृही पाठवावे अशी मागणी शांतिवनचे दीपक नागरगोजे यांनी केली आहे. बीड जिल्हा आणि परिसरातून साडेतीन ते चार लाख ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जात असतो. यंदाही लाखो मजूर कारखान्यावर गेलेले आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मोठी दहशत असताना महानगरे रिकामी होत असून नागरिक मुळ गावी परतत आहेत. देश लाॅकडाऊन आहे. अशा स्थितीत ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची सुरक्षा महत्वाची असून कारखान्यांनी मात्र त्यांना गावी परतण्यास मज्जाव केला आहे. Coronavirus | मुंबईत कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू; राज्यात 156 कोरोनाबाधित  ऊसतोड कामगारांना कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती अधिक आरोग्याच्या कुठल्याही सुविधा कारखान्यांनी त्यांना पुरवलेल्या नाहीत. एकावेळी अनेकजण एकत्र येत आज इथे तर उद्या तिथे करीत हे कामगार उसतोडणीचे काम करीत असतात. त्यांना संसर्गजन्य असणाऱ्या कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती अधिक आहे. आधीच कुठल्याही भौतिक सुविधाअभावी ऊसतोड कामगार ऊसतोडणीचे काम करत असतात. त्यात अशा आजारात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कामगार हे आपली मुले, वृद्ध आई, वडील यांना गावी ठेऊन ऊसतोडणीसाठी जातात. मुलांना हंगामी वसतीगृहांचा आधार असतो मात्र, शाळांना सुट्या असल्याने अनेक ठिकाणी हंगामी वसतिगृह बंद केले गेले आहेत. मजुरांचा जीव त्यांच्या चिमुकल्यांकडे लागला आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे गावी कुणीही नाही. ऊसतोड कामगार ज्या वेळेस कामावर जातात त्यावेळी त्यांच्या घरातील आई-वडील वृद्ध माणसे आणि लहान मुलं हे त्यांच्या गावी घरीच असतात.. कोरणा सारख्या संकटामध्ये प्रत्येक जण आपल्या घराची कुटुंबाची काळजी घेताना पाहायला मिळत आहे ऊसतोड कामगार मात्र आधी आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर उसाच्या फळांमध्ये काम करत आहेत. अनाधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामगार माणसे नाहीत का? खासगी आस्थापनांनी काम बंद ठेवावे, हातावर पोट असणा-यांचे, कंत्राटी कामगारांचे या कळातींल वेतन बंद करु नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, साखर कारखान्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ऊसतोड कामगारांची पिळवणूक नवी नाही मात्र जागतिक महामारिच्या या काळात तरी त्यांना कुटुंबियांकडे पाठवावे ते ही माणसेच आहेत अशी मागणी दीपक नागरगोजे यांनी केली आहे. Special Report | आधी कोरोना त्याात अवकाळीचा मारा; केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola