मुंबई : राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. परिणामी हातात पैसा नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच घरभाडे कसे भरावे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीनर गृहनिर्माण विभागाने भाड्याने राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील घरमालकांना दिल्या आहेत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
घर मालकांसाठी गृहनिर्माण विभागाने सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये 23 मार्च ते 3 मे 2020 या काळात लॉक डाऊन असल्याकारणाने बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच आर्थिक गतीविधी बंद आहे. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झाला असून अनेकांचे उदरनिर्वाहचे साधन बंद आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या बिकट आर्थिक स्थितीमध्ये घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या काळात भाडे भाडेकरू कडून थकल्याने त्याला भाड्याच्या घरातून निष्कसित करण्यात येऊ नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाकडून घर मालकांना देण्यात आल्या आहेत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये भाडेकरुंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नसल्याने भाडे थकले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाडेवसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या काळात भाडे न भरल्यास कुणालाही घरातून काढू नये, अशा सूचना राज्यातील सर्व घरमालकांना देण्यात येत आहे.
नवरा-बायकोचं भांडण झाल्यास नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करणार : पुणे झेडपी
राज्यातील कोरोना रुग्णांचा वेग घटला
राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून साडेपाच दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल. राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा पूर्वी दोन दिवस होता. तो नंतर साडेतीन झाला आता सध्या साडेपाच दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णसंख्या कमी होईल. राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील 83 टक्के मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत.
Labor In Shahapur | गावाकडं पायी निघालेल्या परप्रांतिय मजुरांना पोलिसांनी शहापुरात रोखलं