बुलडाणा : बुलडाण्यातील खामगावमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात 20 लहान मुलं आणि इतर 15 जण जखमी झाले आहेत.
खामगावातल्या आदर्श नगर बाल गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना विहिगाव नदीजवळ अचानक या मंडळावर मधमाशांनी हल्ला केला.
मधमाशांच्या हल्ल्यामुळे घाबरलेले सगळे जण सैरावैरा पळू लागले. तर काहीनं नदीत उडी मारुन आपला जीव वाचवला. या घटनेत जखमी झालेल्या सर्वांना तातडीनं खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.